Yuzvendra Chahal Dainik Gomantak
क्रीडा

Yuzvendra Chahal: धनश्री सोबतच्या ब्रेकअप चर्चेवर युजी म्हणाला...

Yuzvendra Chahal Dhanshree Verma Relationship: टीम इंडियाचा प्रसिध्द फिरकीपटू यजुवेंद्र चहल सध्या चर्चेत आहे.

दैनिक गोमन्तक

Team India's Famous Spinner Yajuvendra Chahal: टीम इंडियाचा प्रसिध्द फिरकीपटू यजुवेंद्र चहल सध्या चर्चेत आहे. तो त्याच्या फिरकीमुळे चर्चेत आहे, असं तुम्हाला वाटत असेल पण तसं नाही. तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. होय, आपल्या लाडक्या युजीच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं आहे. युजी आणि त्याची पत्नी धनश्री कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत असतात. यातच आता धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम पेजवरुन युजीच्या आडनावाला डच्चू दिला आहे. होय, तुम्हालाही हे वाचून धक्का बसला असेल ना ! पण हे अगदीच खरं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या नात्यामध्ये 'का रे दुरावा' म्हणत नवं वादळ आलं आहे. कदाचित दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांमध्ये सर्व काही अलबेल आहे असं काही वाटत नाही. यातच आता युजीची प्रतिक्रिया आली आहे.

दरम्यान, चहल आणि धनश्री चाहत्यांना नवा धक्का देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यांच्यामध्ये काही तरी बिनसलंय अशी चर्चा मागील काही दिवसांपासून जोर धरत होती. त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या. मात्र त्यांच्या नात्यामध्ये काही अलबेल नाही, हे आत्ता धनश्रीच्या इन्स्टाग्राम पेजवरुन समोर आलं आहे. धनश्रीने आपल्या नावात बदल केला आहे. या पेजवर तिचे नाव 'धनश्री वर्मा-चहल' असे होते. मात्र आता तिने या पेजवर 'धनश्री वर्मा' एवढचं नाव ठेवलं आहे. यातून 'चहल' नावाला दे धक्का दिला आहे. आणि याचमुळे सोशल मीडियावर (Social Media) चाहते नात्यातील दुराव्याबद्दल चर्चा करु लागले आहेत.

Yuzvendra Chahal Post

दुसरीकडे, धनश्रीने आपल्या इन्स्टा पेजवरुन युजीचे आडनाव हटवल्यानंतर सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चांना ब्रेक लावण्यासाठी चहलची आता प्रतिक्रिया आली आहे. चहल म्हणाला की, "तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की, आमच्या नात्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या अश्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कृपया या चर्चा इथेच थांबवा.''

तसेच, युजी आणि धनश्री यांचा विवाह 2020 रोजी झाला आहे. लग्नाला दोन वर्षेही पूर्ण झाली नसताना दोघांमध्ये दुरावा आला आहे. मात्र चहल अफवा थांबवण्याविषयी बोलला असला तरी दोघांमध्ये काही तरी बिनसलयं हे नाकारुन चालणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मी चाललोय, काहीतरी रंजक घडेल!',आरजीच्या पाठोपाठ पालेकरांची दिल्लीवारी; Watch Video

अग्रलेख: '...आंबेडकरांच्या 'संघराज्या'च्या व्याख्येने गोव्याला दिली वेगळी ओळख!

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

SCROLL FOR NEXT