Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

प्रत्येक पाकिस्तानीला बनायचयं 'विराट'...: युनूस खान

पाकिस्तानमध्ये (Pakistan) विराट कोहलीसारखी मेहनत करा असे सांगितले जाते.

दैनिक गोमन्तक

टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत यंदा टीम इंडियाची (Team India) खूपच सुमार कामगिरी पाहायला मिळाली. पहिले दोन सामने गमावल्यामुळे विराट कंपनी उपांत्य फेरीच्या शर्यतीमधून बाहेर पडली. 9 वर्षांनंतर असे घडले आहे की, जेव्हा टीम इंडिया कोणत्याही ICC स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचलेली नाही. या दारुण पराभवानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. विराट टी-20 विश्वचषक 2021 नंतर टी-20 कर्णधारपदही सोडत आहे. परंतु दुसरीकडे काही लोकांचा असाही विश्वास आहे की, या दिग्गज खेळाडूला टी-20 संघात पुन्हा स्थान मिळणार नाही. असाच प्रश्न पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खानलाही विचारण्यात आला तेव्हा त्याने चोख उत्तर दिले.

एका पाकिस्तानी चॅनलवर युनूस खान (Younus Khan) विराट कोहलीच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत म्हणाला, 'तुम्हीच सांगा विराट कोहलीला टी-20 संघात का स्थान मिळणार नाही. विराट कोहलीला संपूर्ण जग मानते. पाकिस्तानमध्ये विराट कोहलीसारखी मेहनत करा असे सांगितले जाते. भविष्यात त्याच्यासारखा फलंदाज बनायचे असेल तर कठोर मेहनत हाच एकमेव उपाय आहे. टी-20 विश्वचषकात टूर्नामेंटपूर्वीच विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवण्याची चर्चा करणाऱ्यांकडून चूक झाली आहे. या सर्व गोष्टी स्पर्धेपूर्वी केल्या जात नाहीत, असे झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण संघावर होतो.

पाकिस्तानविरुद्ध फक्त विराट कोहलीच लढत होता: युनूस

युनूस खान पुढे म्हणाला की, 'विराट कोहली मॅच विनर असून त्याला संघातून वगळण्याचा विचारही करवत नाही. विराट हा सामना जिंकून देणारा खेळाडू आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट एकटाच क्रीजवर लढत होता. ना रोहित चालला, ना राहुल चालला ना पंत. केवळ विराट कोहलीचं क्रीजवर तळ ठोकून लढत होता. त्याने अर्धशतकही ठोकले. हा तोच विराट कोहली आहे, ज्याने भारताला ऑस्ट्रेलियात दोन कसोटी मालिका जिंकून दिल्या होत्या. विराटने इंग्लंडमध्येही विजय मिळवून दिला. जर भारत आज T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला असता तर या गोष्टी घडल्या नसत्या. विराट कोहलीकडेच टी-20 चे कर्णधारपदी कायम राहावे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रॅक्टरला रथासारखी चाकं... सोशल मीडियावर व्हायरल झाला भन्नाट 'जुगाड', लोक म्हणाले, "हा आहे नवा भारत"

Shubman Gill Era Begins! पहिल्याच वनडेत 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

Renuka Yellamma History: वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाला, सावदत्ती वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली; यल्लम्माशी निगडित प्रथा

Betoda: बेतोड्यात आयआयटीला विरोध, सरपंचांना धरले धारेवर; ग्रामसभेत ठराव मंजूर

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

SCROLL FOR NEXT