England Dainik Gomantak
क्रीडा

England Cricket: इंग्लंडमधील क्रिकेट संघाला दणका! वर्णद्वेषाच्या प्रकरणात कोट्यवधींचा दंड

इंग्लंडमधील मोठ्या संघाला मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर कोट्यवधींचा दंड ठोठवला आहे.

Pranali Kodre

Yorkshire fined 400,000 pounds and handed 48-point deduction in County Championship: इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. इसीबीने काउंटी क्रिकेटमधील यॉर्कशायर संघावर मोठा दंड ठोकला असून त्याचे काउंटी चॅम्पियनशीपचे पाँइंट्सही कापले आहेत.

इंग्लंडमधील क्रिकेट शिस्त आयोगाने अझीम रफीकच्या वर्णद्वेष प्रकरणामध्ये यॉर्कशायर क्लबवर 4 लाख पाउंड म्हणजेच साधारण 4 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर 48 काउंटी चॅम्पियनशीपचे पाँइंट्स कापले आहेत. तसेच टी20 ब्लास्टमध्येही चार पाँइंट्स कापले गेले आहेत.

दरम्यान, यॉर्कशायरला जर त्यांच्यावरील कारवाईला कमी करण्यासाठी अपील करायचे असेल, तर त्यांना 14 दिवसांचा कालावधी आहे. मात्र, क्लबने त्यांच्यावर इसीबीने केलेली कारवाई स्विकारली आहे.

इंग्लंडचा माजी 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार रफीकने तीन वर्षांपूर्वी यॉर्कशायरकडून त्याच्या खेळण्याबद्दलचे अनुभव सांगितले होते. ज्यानंतर प्रशिक्षक अँड्र्यू गेल, क्रिकेट संचालक मार्टिन मोक्सन, आणि हेडिंग्लेमधील अनेक स्टाफ सदस्यांना काढून टाकण्यात आले आहे. तसेच ६ माजी यॉर्कशायरच्या खेळाडूंवरही कारवाई यापूर्वीच झाली आहे.

इंग्लंड संघातील टीम ब्रेसनन आणि मॅथ्यू होगार्ड या खेळाडूंनी रफीकच्या विरुद्ध वर्णद्वेषी कमेंट केली होती. तसेच माजी कर्णधार मायकल वॉनला मात्र, न्यायालयाने दोषी ठरवले नव्हते.

तथापि, पाँइंट्सही कापण्यात आल्याने यॉर्कशायर संघ काउंटी चॅम्पियनशीपच्या डिव्हिजन 2 मध्ये सर्वात खालच्या क्रमांकावर आला आहे.

याबद्दल क्लबने म्हटले आहे की 'आम्ही क्रिकेट शिस्त आयोगाने यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबविरुद्ध केलेल्या शिक्षेचा स्विकार करत आहोत.'

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यॉर्कशायर संघाकडून काही भारतीय खेळाडूही यापूर्वी खेळले आहेत. यात चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग अशा खेळाडूंचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Bangkok Shooting: कंबोडियासोबत युद्ध सुरु असतानाच थायलंडच्या बँकॉकमध्ये गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःलाही संपवलं Watch Video

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी मोठी घोषणा! 13 हजार धावा करणारा दिग्गज बनला मुख्य प्रशिक्षक

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT