Yashasvi Jaiswal AFP
क्रीडा

Video: 6,6,6... जयस्वालने दिग्गज अँडरसनविरुद्ध सलग तीन षटकार ठोकत लुटली मैफल; विश्वविक्रमालाही घातली गवसणी

Yashasvi Jaiswal Sixes against James Anderson: यशस्वी जयस्वालने राजकोट कसोटीत जेम्स अँडरसनविरुद्ध सलग तीन चेंडूत तीन षटकार मारले.

Pranali Kodre

Yashasvi Jaiswal Smashed 3 Consecutive Sixes:

भारतीय क्रिकेट संघाने रविवारी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 434 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, या सामन्यात यशस्वी जयस्वालने केलेल्या फटकेबाजीने सर्वांचेच लक्ष वेधले.

त्याने या सामन्यात भारताकडून दुसऱ्या डावात 236 चेंडूत नाबाद 214 धावा केल्या. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 12 षटकार मारले. या खेळीदरम्यान त्याने इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनविरुद्ध तीन सलग षटकार खेचत सर्वांनाच चकीत केले.

700 कसोटी विकेट्सच्या विक्रमाच्या जवळ असलेला अनुभवी अँडरसनविरुद्ध जयस्वालने निर्भीडपणे केलेल्या फटकेबाजीने अनेक भारतीय चाहत्यांचीही मनं जिंकली.

त्याने भारताकडून दुसऱ्या डावात अँडरसनने गोलंदाजी केलेल्या 85 व्या षटकातील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग तीन षटकार मारले.

त्याने दुसऱ्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेगला षटकार मारला, तर तिसऱ्या चेंडूवर डीप एक्ट्रा कव्हरला षटकार मारला. तसेच त्याने चौथ्या चेंडूवर सरळ गोलंदाजीच्या डोक्यावरून षटकार मारला. त्याच्या या फटकेबाजीचा व्हिडिओ बीसीसीआयने देखील शेअर केला आहे.

दरम्यान, जयस्वालने या सामन्यात पहिल्या डावातही अनेकदा अँडरसनविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता.

जयस्वालने केली विश्वविक्रमाची बरोबरी

दरम्यान, जयस्वाल एका कसोटी डावात 10 पेक्षा अधिक षटकार मारणारा भारताचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. याबरोबरच त्याने एकाच कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या वासिम आक्रमच्या विश्वविक्रमाचीही बरोबरी केली आहे. आक्रमनेही 1996 साली एका डावात 12 षटकार मारले होते.

त्याचबरोबर त्याने एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचाही विश्वविक्रम केला आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तीन सामन्यात 22 षटकार मारले आहेत. त्याने रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. रोहितने 2019-20 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 19 षटकार मारले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

SCROLL FOR NEXT