Yashasvi Jaiswal Double Century ANI
क्रीडा

IND vs ENG: इंग्लंडच्या बझबॉलवर जयस्वाल भारी! 12 षटकार अन् 14 चौकारांसह डबल सेंच्युरी करत रचला विक्रमांचा डोंगर

Yashasvi Jaiswal Double Century: यशस्वी जयस्वालने राजकोट कसोटीत इंग्लंड विरुद्ध द्विशतक करत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

India vs England, 3rd Test at Rajkot, Yashasvi Jaiswal Double Century Record:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात राजकोटला कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. गुरुवारपासून (15 फेब्रुवारी) सुरू झालेल्या या सामन्यात चौथ्या दिवशी यशस्वी जयस्वालने द्विशतकी खेळी केली. विशेष म्हणजे हे त्याचे या मालिकेतील सलग दुसरे द्विशतक आहे.

जयस्वालने राजकोट कसोटीत दुसऱ्या डावात 236 चेंडूत 14 चौकार आणि 12 षटकारांसह 214 धावांची नाबाद खेळी केली. तो या सामन्यात तिसऱ्या दिवशी शतक केल्यानंतर पाठीतील वेदनेमुळे रिटायर्ड हर्ट होत माघारी परतला होता. परंतु, चौथ्या दिवशी शुभमन गिल 91 धावांवर धावबाद झाल्यानंतर जयस्वाल पुन्हा फलंदाजीला उतरला.

त्याने चौथ्या दिवशीही आपली लय कायम ठेवत फटकेबाजी केली. त्याने हे शतक करताना 85 व्या षटकात इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनविरुद्ध सलग तीन षटकारही मारले. त्याने 231 चेंडूत त्याचे सलग दुसरे द्विशतक पूर्ण केले.

जयस्वालने इंग्लंडविरुद्धच्या चालू असलेल्या कसोटी मालिकेत विशाखापट्टणमला झालेल्या दुसऱ्या कसोटीतही द्विशतकी खेळी केली होती. यासह गिलने या मालिकेत 500 धावाही पूर्ण केल्या आहेत. त्याच्या आता या मालिकेत 6 डावात 545 धावा झाल्या आहेत. यासह जयस्वालने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्यावरच एक नजर टाकू

सलग दोन कसोटी सामन्यात द्विशतके करणारे भारतीय क्रिकेटपटू

  • विनोद कांबळी (224 धावा विरुद्ध इंग्लंड, मुंबई आणि 227 धावा विरुद्ध झिम्बाब्वे; 1992/93)

  • विराट कोहली (213 धावा विरुद्ध श्रीलंका, नागपूर आणि 243 धावा विरुद्ध श्रीलंका, दिल्ली; 2017-18)

  • यशस्वी जयस्वाल (209 धावा विरुद्ध इंग्लंड, विशाखापट्टणम आणि 214 धावा विरुद्ध इंग्लंड, राजकोट; 2024)

एकाच कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू

  • 12 षटकार - यशस्वी जयस्वाल (भारत विरुद्ध इंग्लंड, राजकोट, 2024)

  • 12 षटकार - वासिम आक्रम (पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे, शेखुपुरा, 1996)

  • 11 षटकार - मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे, पर्थ 2003)

  • 11 षटकार- नॅथन ऍस्टले (न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, ख्राईस्टचर्च, 2002)

  • 11 षटकार - ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, शारजाह, 2014)

  • 11 षटकार -ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, ख्राईटचर्च, 2014)

  • 11 षटकार - बेन स्टोक्स (इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केपटाऊन, 2016)

  • 11 षटकार - कुशल मेंडिस (श्रीलंका विरुद्ध आयर्लंड, गॉल, 2023)

एकाच कसोटी मालिकेत भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू

  • 22 षटकार - यशस्वी जयस्वाल (विरुद्ध इंग्लंड, 2024)*

  • 19 षटकार - रोहित शर्मा (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2019)

  • 14 षटकार - हरभजन सिंग (विरुद्ध न्यूझीलंड, 2010)

  • 11 षटकार - नवज्योत सिद्धू (विरुद्ध श्रीलंका, 1994)

एकाच कसोटी मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे डावखुरे फलंदाज

  • 545 धावा - यशस्वी जयस्वाल (विरुद्ध इंग्लंड, 2024)

  • 534 धावा - सौरव गांगुली (विरुद्ध पाकिस्तान, 2007)

  • 463 धावा - गौतम गंभीर (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2008)

  • 445 धावा - गौतम गंभीर (विरुद्ध न्यूझीलंड, 2009)

भारताकडून दुसऱ्या डावात द्विशतक करणारे क्रिकेटपटू

  • नाबाद 203 धावा - मन्सुर अली खान पतौडी (विरुद्ध इंग्लंड, दिल्ली, 1964)

  • नाबाद 200 धावा- दिलीप सरदेसाई (विरुद्ध वेस्ट इंडिज, मुंबई, 1965)

  • 220 धावा - सुनील गावसकर (विरुद्ध वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन, 1971)

  • 221 धावा - सुनील गावसकर (विरुद्ध इंग्लंड, द ओव्हल, 1979)

  • 281 धावा - व्हीव्हीएस लक्ष्मण (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कोलकाता, 2001)

  • 212 धावा - वसिम जाफर (विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंट जॉन्स, 2006)

  • नाबाद 214 धावा - यशस्वी जयस्वाल (विरुद्ध इंग्लंड, राजकोट, 2024)

सर्वात कमी डावात कसोटीत 150 पेक्षा अधिक धावांच्या तीन खेळी करणारे खेळाडू

  • 10 डाव - नील हर्वे

  • 13 डाव - यशस्वी जयस्वाल

  • 15 डाव - डॉन ब्रॅडमन

  • 15 डाव - ग्रॅमी स्मिथ

  • 18 डाव - चेतेश्वर पुजारा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

SCROLL FOR NEXT