Emerging Asia Cup: कर्णधार यश धुलचा श्रीलंकेत जलवा पाहायला मिळाला. इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत भारतासाठी पहिल्याच सामन्यात त्याने झंझावाती शतक ठोकले. त्याने भारताला 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला.
कोलंबोमध्ये इमर्जिंग आशिया चषक खेळला जात आहे, ज्यातील तिसऱ्या सामन्यात यूएई A संघ भारत A संघासमोर होता. प्रथम फलंदाजी करताना UAE संघ 50 षटकात 9 विकेट गमावत 175 धावाच करु शकला.
भारत A संघाने प्रथम 2 गडी गमावून 141 चेंडूत 176 धावांचे लक्ष्य गाठले. भारताने 8 गडी राखून विजय मिळवला.
दरम्यान, हर्षित राणाने 41 धावांत 4 बळी घेतले. तर नितीश कुमार रेड्डी आणि मानव यांनी प्रत्येकी 2-2 बळी मिळवले. प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. भारताने दोन्ही सलामीवीर लवकर गमावले होते.
साई सुदर्शन 8 आणि अभिषेक शर्मा 19 धावांवर बाद झाले. कर्णधार यश आणि निकिन जोस यांनी संघाची धुरा सांभाळली. दोघांनीही अप्रतिम फलंदाजी केली.
यशने 84 चेंडूत नाबाद 108 धावा ठोकल्या, ज्यात त्याने 20 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर निकिनने 53 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या.
कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात UI A संघ प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 175/9 धावाच करु शकला. टीम इंडियाला (Team India) 50 षटकात 176 धावा करायच्या होत्या. भारताने 27 व्या षटकात हे लक्ष्य गाठले आणि स्पर्धेतील पहिला विजय मिळवला.
टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी केली. पहिल्याच षटकात हर्षित राणाने भारताची (India) पहिली विकेट घेतली. त्यानंतर यूएईचा आघाडीचा फलंदाज अंश टंडन 5 आणि लवप्रीत सिंह 2 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतले.
आर्यांश शर्माने 38 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. टीम इंडियाचा अर्धा संघ 66 धावांत पॅव्हेलियनमध्ये परतला होता, मात्र सहाव्या विकेटसाठी कॅप्टन चिदंबरम आणि मोहम्मद फराजुद्दीन यांच्यात 80 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी पाहायला मिळाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.