Yash Dayal Leaves Uttar Pradesh Dainik Gomantak
क्रीडा

RCB Star Player Transfer: RCBच्या स्टार खेळाडूचा मोठा निर्णय! संघाला ठोकला रामराम; आता 'या' संघाकडून खेळताना दिसणार

Yash Dayal Leaves Uttar Pradesh: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)चा वेगवान गोलंदाज यश दयाल याने आपल्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीबाबत मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Sameer Amunekar

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)चा वेगवान गोलंदाज यश दयाल याने आपल्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीबाबत मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशकडून अनेक वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर आता त्याने दुसऱ्या राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला असून पुढील देशांतर्गत हंगामात तो छत्तीसगड संघाकडून खेळण्याची शक्यता आहे.

NOCसाठी अर्ज दाखल

माध्यमांतील वृत्तानुसार, यश दयालने उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेकडे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो अधिकृतपणे छत्तीसगड संघात दाखल होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या देशांतर्गत कारकिर्दीची नवी सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही काळापासून क्रिकेटपासून दूर

प्रयागराजमध्ये जन्मलेल्या यश दयालने उत्तर प्रदेशकडून सातत्यपूर्ण कामगिरी करत भारतीय क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली. मात्र, गेल्या वर्षी त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर तो चर्चेत आला. त्यानंतर तो IPL 2026 मध्ये सहभागी होऊ शकला नाही. तसेच उत्तर प्रदेश टी-20 लीगमध्येही तो मैदानात दिसला नाही. जून 2025 नंतर तो स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर असल्याचे पाहायला मिळाले.

IPLमधून मिळाली मोठी ओळख

यश दयालने 2022 मध्ये गुजरात टायटन्सकडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण केले. दोन हंगाम गुजरातकडून खेळल्यानंतर 2024 मध्ये तो RCBमध्ये दाखल झाला. त्यानंतर त्याने बंगळुरूच्या गोलंदाजी आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या अचूक डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीमुळे त्याने क्रिकेटविश्वात वेगळी छाप पाडली.

आकडेवारीही प्रभावी

आतापर्यंत IPLमध्ये यश दयालने 43 सामने खेळताना 41 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. त्याने सातत्याने संघासाठी महत्त्वाचे स्पेल टाकले असून अनेक सामन्यांत निर्णायक भूमिका बजावली आहे. आता राज्य संघ बदलल्यानंतर त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळते का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

नव्या संघातून पुनरागमनाची उत्सुकता

देशांतर्गत क्रिकेटमध्ये संघबदल हा खेळाडूंसाठी नवी संधी ठरू शकतो. छत्तीसगडकडून खेळण्याची संधी मिळाल्यास यश दयाल स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. आगामी देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्याच्या कामगिरीवरच त्याच्या पुढील क्रिकेट कारकिर्दीचे चित्र अवलंबून असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT