WWE Star Roman Reigns Corona Positive

 

Dainik Gomantak

क्रीडा

WWE स्टार रोमन रेन्स कोरोना पॉझिटिव्ह, ब्रॉक लेसनर विरुद्धच्या लढतीला ब्रेक

डब्ल्यूडब्ल्यूईनेही दोघांमधील या खेळाचे मोठे प्रमोशन केले होते

दैनिक गोमन्तक

Roman reigns: WWE युनिव्हर्सल चॅम्पियन रोमन रेन्स कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. यामुळे तो WWE PPV च्या पहिल्या दिवशी ब्रॉक लेसनर विरुद्ध लढू शकणार नाही. रान्सने ट्विट करून स्वतः कोविड पॉझीटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. नवीन वर्षात रोमन रेन्स आणि ब्रॉक लेसनर यांच्यातील सामन्याची लोक आतुरतेने वाट पाहत होते, त्यावर आता पाणी फेरले आहे. डब्ल्यूडब्ल्यूईनेही दोघांमधील या खेळाचे मोठे प्रमोशन केले होते.

रोमन रेन्सने ट्विट केले की, "मला माझ्या युनिव्हर्सल चॅम्पियनशिपला डिफेंड करण्यासाठी आज रात्री परफॉर्म करायचे आहे. मात्र, दुर्दैवाने आज माझी COVID-19चाचणी सकारात्मकआली. योग्य कोविड प्रोटोकॉलमुळे, मी मूळ वेळापत्रकानुसार स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. मी शक्य तितक्या लवकर परत येण्यास उत्सुक आहे."

कोरोना व्हायरसच्या धोक्यांदरम्यान रोमन रेन्सने काही दिवसांपूर्वी WWE लाइव्ह इव्हेंटमधून आपले नाव मागे घेतले होते. रोमनच्या माघारीमुळे उसोसला खूप फायदा झाला. टॅग टीम चॅम्पियनशिप सामन्यात, उसोसने रेन्सच्या अनुपस्थितीत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला आणि चॅम्पियनशिप जिंकली.

WWE सध्या कोरोनाशी संबंधित समस्यांशी झुंज देत आहे. मंडे नाईट RAW सह त्याच्या अनेक शोवर याचा परिणाम झाला आहे. सेठ रोलिन्स, बियान्का ब्लेअर आणि बेकी लिंच यासारख्या अनेक प्रमुख व्यक्ती RED ब्रँडच्या अलीकडील भागांमध्ये पूर्णपणे अनुपस्थित होते. माजी डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन सेठ रोलिन्सने काही दिवसांपूर्वी एका ट्विटद्वारे सांगितले होते की त्याचीही कोरोनाव्हायरसची चाचणी सकारात्मक आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT