India vs England and Australia vs West Indies AFP
क्रीडा

WTC Points-table: भारत-ऑस्ट्रेलियाला पराभवाचे धक्के; पण कांगारुंचे अव्वल स्थान कायम, तर रोहितसेना 'या' क्रमांकावर

WTC 2023-25 Points Table: रविवारी भारतला इंग्लंडने आणि ऑस्ट्रेलियाला वेस्ट इंडिजने कसोटी सामन्यात पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर WTC पॉइंट्सटेबलमध्ये मोठे बदल झाल्याचे दिसले.

Pranali Kodre

WTC Points-Table:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात हैदराबादमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी (28 जानेवारी) 28 धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, गुरुवारीच वेस्ट इंडिज संघानेही ब्रिस्बेनमधील गॅबा येथे झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला 8 धावांनी पराभूत केले. या विजयासह वेस्ट इंडिजने 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली.

दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेचा भाग आहेत. त्याचमुळे या दोन्ही सामन्यांनंतर टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत बदल झाले आहेत. या गुणतालिकेत संघाचे स्थान विजयी टक्केवारीनुसार ठरते.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव स्विकारावा लागला असला, तरी त्यांच्या पहिल्या क्रमांकाला धक्का लागलेला नाही. कारण पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाची टक्केवारी घसरली असली, तरी ती इतर सहभागी 8 संघापेक्षा अधिक आहे. सध्या ऑस्ट्रेलिया 55 टक्केवारीसह अव्वल क्रमांकावर आहेत.

मात्र, भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवाचा मोठा फटका बसला आहे. भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावरून थेट पाचव्या क्रमांकावर घसरला आहे.

भारतीय संघाची विजयाची टक्केवारी या पराभवानंतर 50 हुन खाली घसरली असून आता 43.33 अशी आहे. दरम्यान, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे संघ अद्यापही गुणतालिकेत खालच्या क्रमांकावर असले, तरी त्यांच्या टक्केवारीत सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

वेस्ट इंडिज सध्या 33.33 टक्केवारीसह सातव्या आणि इंग्लंड 29.16 टक्केवारीसह आठव्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका, तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड आणि चौथ्या क्रमांकावर बांगलादेश आहे. या तिन्ही संघांची टक्केवारी प्रत्येकी 50 अशी आहे.

तसेच सहाव्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानची विजयी टक्केवारी 36.66 आहे, तर श्रीलंका मात्र अद्याप खाते उघडू शकलेले नाहीत, त्यामुळे ते सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहेत.

तथापि, भारत आणि इंग्लंड यांच्यातील आणखी चार सामना बाकी आहेत. त्यामुळे या चार सामन्यांतरही मोठा बदल टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत घडू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार वॉटर मेट्रो टॅक्‍सी! प्रवाशांना मिळणार नवा पर्याय, नदीपरिवहन मंत्री सुभाष फळदेसाईंची माहिती

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यरने दुखापतीबद्दल दिली मोठी अपडेट, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Goa Live Updates: रेल्वेच्या धडकेने मये येथे रेडा ठार

Horoscope: सुवर्णयोग! वृषभ, मिथुनसह 5 राशींना प्रचंड आर्थिक लाभ आणि यश; मेष आणि कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टी टाळा

Goa Rain: हातातोंडाशी आलेला घास मातीमोल, 'पर्जन्यराजा' अवेळी कोपला; शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट

SCROLL FOR NEXT