Team India Dainik Gomantak
क्रीडा

WTC Final मध्ये पोहोचण्याची टीम इंडियाला मोठी संधी, 'कॅप्टन'ने केली भविष्यवाणी!

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांची मोठी धावसंख्या उभारली. सलामीवीर उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 180 धावांचे योगदान दिले.

Manish Jadhav

IND vs AUS 4th Test, Sourav Ganguly Post: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांची मोठी धावसंख्या उभारली. सलामीवीर उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 180 धावांचे योगदान दिले.

त्याने 422 चेंडूंच्या संयमी खेळीत 21 चौकार मारले. दरम्यान, टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एक ट्विट केले आहे.

भारतीय संघ अजूनही खूप मागे आहे

अहमदाबाद कसोटीत 2 दिवसांचा खेळ झाला आहे. सलामीवीर उस्मान ख्वाजा (180) आणि कॅमेरुन ग्रीन (114) यांच्या शानदार शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने 480 धावा केल्या.

दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा (Australia) डाव आटोपला. यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 10 षटकांत 36 धावा केल्या होत्या.

कर्णधार रोहित शर्मा 17 आणि युवा सलामीवीर शुभमन गिल यष्टीमागे 18 धावा करुन क्रीझवर होते. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने शानदार कामगिरी करत 91 धावांत 6 बळी घेतले. भारत सध्या ऑस्ट्रेलियापेक्षा 444 धावांनी मागे आहे.

WTC फायनलसाठी हा सामना महत्त्वाचा आहे

भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम फेरीचे थेट तिकीट मिळवायचे असेल, तर अहमदाबाद कसोटी जिंकावी लागेल.

ऑस्ट्रेलिया आधीच WTC फायनलमध्ये पोहोचला आहे. हा सामना अनिर्णित राहिला तर टीम इंडियाला श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल आणि अनुकूल निकालाची आशा करावी लागेल.

गांगुलीने पोस्ट केले

दरम्यान, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी ट्विट करुन या पद्धतीचा खुलासा केला आहे. अश्विनने कमाल दाखवली असून आता भारतीय फलंदाजांना मोठी संधी असल्याचे गांगुलीने म्हटले आहे.

त्याने लिहिले, 'चांगल्या खेळपट्टीवर अश्विनला इतकी चांगली गोलंदाजी करताना पाहणे आश्चर्यकारक आहे. आशा आहे की, हा एक चांगला कसोटी सामना असेल. काही कठीण विकेट्सनंतर या मालिकेत भारतीय फलंदाजांना फलंदाजी करण्याची चांगली संधी आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

तरुणांसाठी 'म्हजी बायल' योजना! दिवाळीनंतर उडणार लग्नांचे बार; सिधुदत्त कामतांचा मजेशीर Video Viral

डेनियलने 'हणजूण बीच'चा गळा घोटलाय, शिवोलीच्या आमदार गप्प का? लोबोंच्या मुलावर आरोप; RGPची Post Viral

'ऑपरेशन सिंदूर'नंतर जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा पुन्हा सक्रिय, भारताविरुद्ध मोठ्या रॅलीचे आयोजन; गुप्तचर संस्थांची लाहोरवर करडी नजर

Neeraj Chopra: 'गोल्डन बॉय' बनला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुखांच्या हस्ते सन्मान VIDEO

SCROLL FOR NEXT