जागतिक कसोटी स्पर्धेत (WTC) भारताला (India) पराभावाचा सामना करावा लागल्याने आता भारतीय निवड समिती खडबडून जागी झाली आहे. भारतीय संघ ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये इंग्लंडविरुध्द (England) ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत युवा चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ श्रीलंकेत (Sri Lanka) एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी जाणार आहे. यात युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या दोन्ही दौऱ्यावर आता भारतीय निवड समिती (selectors of the Indian team) बारकाईने लक्ष्य देणार आहे. त्यासाठी निवडसमितीचे सदस्य या दौऱ्यावर जाणार असल्याचे समोर येत आहे.
भारतीय संघ सद्या इंग्लंडमध्ये आहे. पुढील महिन्यात भारताचा दुसरा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाईल. या दोन्ही दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या सामन्यांत खेळ पाहण्यासाठी निवडकर्ते उपस्थित असतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक संघ दोन ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारात खेळणार असल्याचे पहिल्यांदाच घडत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ कसोटी सामना खेळणार आहे, तर दुसरीकडे शिखर धवनच्या नेतृत्वात श्रीलंकेत एकदिवसीय सामना खेळेल.
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा, सुनील जोशी आणि हरविंदर सिंग हे इंग्लंडला रवाना होणार आहेत. तर अबया कुरुविला आणि देवाशीष मोहंती हे दोघे भारताच्या दुसऱ्या संघासोबत श्रीलंकेला जाणार आहेत. हे दोघे सद्या मुंबईत विलगीकरणात आहेत. भारतचा श्रीलंका दौरा १३ जुलैला सुरु होत आहे. १३ ते १८ जुलैमध्ये तीन एकदिवसीय सामने आणि २१ ते २५ जुलै दरम्यान टी-२० सामने होणार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.