Shardul Thakur | WTC 2023 Final Dainik Gomantak
क्रीडा

Shardul Thakur: नॉर्मल माणूस वाटला का? लॉर्ड शार्दूलने मिळवलंय थेट डॉन ब्रॅडमनच्या पंक्तीत स्थान

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये शार्दुल ठाकूरने पहिल्या डावात अर्धशतक करत मोठा विक्रम केला आहे.

Pranali Kodre

Shardul Thakur Record: कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना बुधवारपासून (7 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया संघात इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर सुरू झाला आहे. या सामन्यात खेळताना भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात शार्दुल भारताकडून पहिल्या डावात 8 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. त्यावेळी भारतीय संघ 152 धावांवर 6 विकेट्स अशा कठीण परिस्थितीत होता. पण त्याने अजिंक्य रहाणेला शानदार साथ देत सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, रहाणे 89 धावांवर बाद झाल्यानंतरही शार्दुलने त्याची लय कायम ठेवत अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर तो लगेचच बाद झाला. त्याने 109 चेंडूत 51 धावांची खेळी केली. हे त्याचे द ओव्हल मैदानावरील सलग तिसरे अर्धशतक आहे.

त्याने यापूर्वी 2021 मध्ये ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्या 57 आणि 60 धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो द ओव्हल मैदानावर कसोटीत सलग तीन 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा तिसरा परदेशी खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी केवळ सर डॉन ब्रॅडमन आणि ऍलेन बॉर्डर या ऑस्ट्रेलियन दिग्गजांनी केली होती.

ब्रॅडमन यांनी 1930 साली ओव्हलवर इंग्लंडवर 232 धावांची खेळी केली होती. त्यानंतर ते 1934 साली पुन्हा ओव्हलवर खेळले. त्यावेळी त्यांनी 244 आणि 77 धावांच्या खेळी इंग्लंडविरुद्ध केल्या होत्या.

तसेच बॉर्डर यांनी 1985 साली इंग्लंडविरुद्ध ओव्हलवर दुसऱ्या डावात 58 धावांची खेळी केली होती. त्यानंतर 1989 मध्ये ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध 76 आणि नाबाद 51 धावांची खेळी केली होती.

दरम्यान, भारतीय संघ पहिल्या डावात 69.4 षटकात 296 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताला 173 धावांनी पिछाडी स्विकारावी लागली आहे. भारताकडून रहाणे आणि शार्दुल यांनी अर्धशतके झळकावली. याशिवाय रविंद्र जडेजाने 48 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही.

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल स्टार्क, स्कॉट बोलंड आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने 1 विकेट घेतली. तत्पुर्वी, ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४६९ धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

SCROLL FOR NEXT