Shardul Thakur Dainik Gomantak
क्रीडा

Shardul Thakur: ओव्हलवर 'लॉर्ड' शार्दुलचा जलवा! इंग्लंडमध्ये 'हा' पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये शार्दुल ठाकूरने अर्धशतकी खेळी करण्याबरोबरच एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

WTC 2023 Final, Shardul Thakur Slams third Half Century at the Oval: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना द ओव्हलवर सुरू झाला आहे. या सामन्यात खेळताना शार्दुल ठाकूरने मोठा विक्रम केला आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 469 धावांवर रोखल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला उतरला. पण भारताने 152 धावातच सहा विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर शार्दुलने अजिंक्य रहाणेबरोबर भारताचा डाव सावरला. या दोघांनी मिळून शतकी भागीदारीही केली. त्यामुळे शार्दुलने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

त्याने आणि रहाणेने सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी पॅट कमिन्सने रहाणेला 89 धावांवर बाद करत तोडली. रहाणेचा अप्रतिम झेल कॅमेरॉन ग्रीनने झेलला.

शार्दुलचा विक्रम

दरम्यान, रहाणे आणि शार्दुल यांच्यातील भागीदारी ही भारताकडून इंग्लंडमध्ये सातव्या किंवा त्याखालील क्रमांकासाठी झालेल्या विकेटसाठी सहावी शतकी भागीदारी होती. तसेच या सहा भागीदाऱ्यांपैकी दोन भागीदाऱ्यांमध्ये शार्दुल ठाकूरचा समावेश आहे.

त्यामुळे इंग्लंडमध्ये भारताकडून सातव्या किंवा त्याखालील क्रमांकासाठी दोन शतकी भागीदाऱ्यांमध्ये सामील असणारा शार्दुल एकमेव खेळाडू आहे. त्याने यापूर्वी ओव्हलच्या मैदानातच 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना ऋषभ पंतबरोबर 100 धावांची भागीदारी केली होती.

शार्दुलचं तिसरं अर्धशतक

दरम्यान, शार्दुलने रहाणे बाद झाल्यानंतरही आपली लय कायम ठेवत अर्धशतक झळकावले. पण अर्धशतकानंतर तो लगेचच बाद झाला. त्याने 109 चेंडूत 51 धावांची खेळी केली. हे त्याचे ओव्हलवर झळकावलेले तिसरे अर्धशतक आहे. त्याने यापूर्वी 2021 मध्ये ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्या 57 आणि 60 धावांची खेळी केली होती.

भारत 296 धावांवर सर्वबाद

दरम्यान, भारतीय संघ पहिल्या डावात 69.4 षटकात 296 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताला 173 धावांनी पिछाडी स्विकारावी लागली आहे. भारताकडून रहाणे आणि शार्दुल यांनी अर्धशतके झळकावली. याशिवाय रविंद्र जडेजाने 48 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही.

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल स्टार्क, स्कॉट बोलंड आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT