Rohit Sharma & Pat Cummins Dainik Gomantak
क्रीडा

WTC 2023 फायनल कधी, कुठे आणि कसे पाहायचे; लाइव्ह स्ट्रीमिंगसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

WTC 2023 Final IND vs AUS: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (WTC Final 2023) चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.

Manish Jadhav

WTC 2023 Final IND vs AUS: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (WTC Final 2023) चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

या सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असेल. त्याचबरोबर, ऑस्ट्रेलियाची कमान पॅट कमिन्सच्या हाती असेल. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला असून ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच WTC फायनल खेळणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल कधी खेळली जाईल?

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान खेळवला जाईल. या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.

टेस्ट चॅम्पियनशिप फायनल कुठे खेळवली जाईल?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणार आहे.

भारतीय वेळेनुसार सामना कधी सुरु होईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे.

टीव्ही आणि मोबाईलवर डब्ल्यूटीसी फायनल लाईव्ह कसे पाहायचे?

भारत आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात खेळला जाणारा अंतिम सामना भारतातील टीव्हीवरील स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. त्याचवेळी, आपण मोबाइलवर डिस्ने प्लस हॉटस्टार पाहू शकता.

WTC फायनलसाठी दोन्ही संघ:

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, सीईओ राजकुमार, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

स्टँडबाय खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलियाचा 15 सदस्यीय संघ: पॅट कमिन्स (क), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगल्स (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी , स्टीव्हन स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

स्टँडबाय खेळाडू: मिचेल मार्श, मॅट रेनशॉ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

SCROLL FOR NEXT