Steve Smith and Travis Head Wickets Dainik Gomantak
क्रीडा

WTC 2023 Final: अखेर शतकवीरांच्या विकेट्स मिळाल्या! सिराज-शार्दुलनं असं केलं हेड अन् स्मिथला आऊट

Video: कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये शतक केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या विकेट्स दुसऱ्या दिवशी घेण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले.

Pranali Kodre

India vs Australia, WTC 2023 Final, Steve Smith - Travis Head Wickets: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना द ओव्हल मैदानावर बुधवारी (7 जून) सुरू झाला आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दिवशी स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड यांनी शानदार फलंदाजी करत वर्चस्व गाजवले होते. पण दुसऱ्या दिवशी (8 जून) या दोघांच्या विकेट्स घेण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 76 धावांवर 3 विकेट्स गमावल्यानंतर स्मिथ आणि हेड यांच्या जोडने डाव सावरला होता. त्यांनी पहिल्या दिवसाखेर स्मिथ 95 धावांवर आणि हेड 146 धावांवर नाबाद होते.

त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच स्मिथने शतक आणि हेडने दिडशतक पूर्ण केले. पण त्यानंतर पहिल्याच सत्रात या दोघांनीही विकेट्स गमावल्या. सर्वात आधी हेडला डावाच्या ९२ व्या षटकात मोहम्मद सिराजने चूक करण्यास भाग पाडले.

त्याने टाकलेल्या चेंडूवर हेडने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या ग्लव्ह्जला लागला आणि मागे यष्टीरक्षक केएस भरतच्या हातात गेला. त्यामुळे हेडला विकेट गमावावी लागली. हेडने 174 चेंडूत 163 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 25 चौकार आणि 1 षटकार मारला.

तो बाद झाल्यानंतर कॅमेरॉन ग्रीनही झटपट बाद झाला. त्याच्यानंतर स्मिथलाही शार्दुल ठाकूरने 99 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत केले. शार्दुलने ऑफसाईड ऑफला टाकलेल्या चेंडूवर स्मिथने शॉट मारण्याचा प्रयत्न केला.

पण चेंडू त्याच्या बॅटची आतली कड घेऊन स्टंपवर आदळला. त्यामुळे स्मिथला माघारी परतावे लागले. स्मिथने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 19 चौकार मारले.

दरम्यान, स्मिथ आणि हेड यांच्यात चौथ्या विकेटसाठी 185 धावांची भागीदारी झाली. ही इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाकडून चौथ्या विकेटसाठी केलेली दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर डॉन ब्रॅडमन आणि बिल पोन्सफोर्ड यांच्या नावावर आहे. त्यांनी 1934 साली हेडिंग्लेमध्ये 388 धावांची चौथ्या विकेटसाठी भागीदारी केली होती.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने हेड आणि स्मिख यांच्या शतकांच्या जोरावर कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात 400 धावांचा टप्पा पार केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT