Wriddhiman Saha Dainik Gomantak
क्रीडा

ऋद्धिमान साहा चा मोठा खुलासा, गांगुली ने म्हटलं होतं, ‘जब तक मैं BCCI में हूं...

श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघातून त्याला वगळण्यात आले आहे. तेव्हापासून भारताचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज चर्चेत आहे.

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज असणाऱ्या ऋद्धिमान साहाला आता भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघातून त्याला वगळण्यात आले आहे. तेव्हापासून भारताचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज चर्चेत आहे. दरम्यान त्याने दिलेल्या मुलाखतीमुळे टीम इंडिया (Team India) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ज्यात त्याने मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्याशी संबंधित आहे. साहाचा (Wriddhiman Saha) हा खुलासा गांगुलीकडून मिळालेल्या सांत्वनाशी संबंधित आहे, जे त्याने कानपूर कसोटीनंतर वक्तव्य केले होते. (Wriddhiman Sahas Disclosure Ganguly Said As long As I Am In BCCI You Are In The Team)

साहाने म्हटले की, न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) कानपूर कसोटीत 61 धावांची नाबाद इनिंग खेळल्यानंतर मला सौरव गांगुली यांचा एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला, ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते - 'मी जोपर्यंत बीसीसीआयमध्ये (BCCI) आहे, तोपर्यंत तु संघात राहणार'. त्या संदेशानंतर माझा आत्मविश्वास वाढला होता. परंतु आता अचानक सर्वकाही बदलले.

साहाने कानपूर कसोटीचा तो किस्सा सांगितला

गतवर्षी नोव्हेंबर अखेरीस खेळल्या गेलेल्या त्या कसोटीदरम्यान ऋद्धिमान साहाला मानदुखीचा त्रास झाला होता. त्यामधूनही त्याने 61 धावांची शानदार खेळी केली होती. मानदुखीचा त्रास एवढा वाढला होता की, तो सामना साहाला अर्ध्यातच सोडावा लागला होता. त्यानंतर केएस भरतला संघात स्थान देण्यात आले होते. तसेच तेव्हा साहाच्या त्या खेळीचे गांगुलीकडून कौतुकही करण्यात आले होते. त्यावेळी साहाने म्हटले होते की, “न्यूझीलंडविरुद्ध 61 धावांच्या नाबाद खेळीनंतर दादांनी (Ganguly) मला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करुन अभिनंदन केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, ''जोपर्यंत मी बीसीसीआयमध्ये आहे, तोपर्यंत तु संघात राहणार.''

तो पुढे म्हणाला, बीसीसीआय अध्यक्षांचे एवढं मोठं बोलणं ऐकून माझा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. पण आता मला समजत नाहीये की अचानक सगळं कसं बदललं?

साहाला का वगळण्यात आलं कोणी सांगत नाही?

गांगुलीच्या त्या संदेशाच्या अडीच महिन्यांनंतरचे चित्र पूर्णपणे वेगळे आहे. साहा संघात नाही तर बाहेर आहे. त्याला का वगळण्यात आले हे कोणीच सांगत नाही. निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा म्हणाले की, 'आम्ही याबाबत काहीही बोलू शकत नाही.'

संघात निवड न झाल्यानंतर, साहाने असेही म्हटले की, ''मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघ व्यवस्थापनाने मला निवृत्तीचा विचार करण्यास सांगितले आहे, कारण यापुढे निवडीसाठी माझा विचार केला जाणार नाही.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT