Wrestlers Protest Dainik Gomantak
क्रीडा

Wrestlers Meet Anurag Thakur: क्रीडामंत्र्यांशी चर्चेनंतर कुस्तीपटूंची आंदोलनाला स्थगिती, पण 15 जूनपर्यंत जर...

खासदार ब्रिजभूषण सिंगविरुद्ध आंदोनल करत असलेल्या भारतीय कुस्तीपटू आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यात बुधवारी 6 तास चर्चा झाली.

Pranali Kodre

Bajrang Punia and Sakshi Malik meet Anurag Thakur: भारताचे पदक विजेते कुस्तीपटूंनी कुस्तीपटू भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंगविरुद्ध पुकारलेलं आंदोलनाची भारतभरात सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, या आंदोलानाबाबत बुधवारी केंद्रिय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंमध्ये बराचवेळ चर्चा झाली.

कुस्तीपटूंनी ब्रिजभूषणविरुद्ध महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. याच प्रकरणात कारवाई करण्याची मागणी कुस्तीपटू गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत. त्याचमुळे ते आंदोलनही करत आहेत. कुस्तीपटूंच्या आंदोलनात बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट असे भारतीय कुस्तीपटू सामील आहेत.

दरम्यान, आता बुधवारी या प्रकणाबाबत अनुराग ठाकूर आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया व साक्षी मलिक यांच्यात जवळपास 6 तास चर्चा झाली आहे. या चर्चेदरम्यान प्रशासनाने 15 जूनपर्यंतचा वेळ मागितले असून तोपर्यंत पोलिस तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केले जाईल असे आश्वासन दिले आहे.

त्यामुळे कुस्तीपटूंनी 15 जूनपर्यंत आंदोलनाला स्थगिती दिली आहे. पण असे असले तरी कुस्तीपटूंनी असाही इशारा दिला आहे की जर 15 जूनपर्यंत कारवाई झाली नाही, तर ते त्यांचे आंदोलन पुन्हा सुरू करतील. तसेच अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे की भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक 30 जूनपर्यंत होईल.

काय म्हणाले कुस्तीपटू?

साक्षी मलिकने सांगितले आहे की '15 जूनपर्यंत पोलीस तपास पूर्ण करत आहेत, तोपर्यंत आम्हाला आंदोलनाला स्थगित करण्याची विनंती करण्यात आली होती.'

बजरंग पुनियाने सांगितले की 'आम्ही काही गोष्टींवर चर्चा केली. 15 जूनपर्यंत पोलीसांना तपास पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच क्रीडा मंत्र्यांनी आम्हाला तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्यास सांगितले आहे.'

'तसेच क्रीडा मंत्र्यांनी महिला कुस्तीपटूंच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल, असेही सांगितले आहे. आम्ही त्यांना विनंती केली आहे की कुस्तीपटूंच्या विरुद्ध नोंदवले गेलेले एफआयआर मागे घेण्यात यावे. ही विनंती मान्य करण्यात आली आहे.'

तसेच बजरंग पुनियाने असेही स्पष्ट केले की 'जर 15 जूनपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही, तर आम्ही आमचे आंदोलन कायम करू.'

अनुराग ठाकूर म्हणाले...

चर्चेनंतर अनुराग ठाकूर यांनीही प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सांगितले की 'कुस्तीपटूंशी माझी 6 तास चर्चा झाली. 15 जूनपर्यंत चौकशी पूर्ण करून आरोपपत्र सादर केले जातील, असे आश्वासन आम्ही कुस्तीपटूंना दिले आहे.'

भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक 30 जूनपर्यंत होईल. तसेच कुस्ती महासंघाची अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली जाईल, ज्याचे अध्यक्षपद महिला सदस्य स्विकारतील.'

याशिवाय अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली की 'कुस्तीपटूंवरील सर्व एफआयआर मागे घेण्यात येतील. याशिवाय 3 कार्यकाळ पूर्ण केलेल्या ब्रिजभूषण सिंग आणि त्यांचे सहकारी पुन्हा निवडून येऊ नये, अशी विनंतीही कुस्तीपटूंनी केली आहे. 15 जूनपूर्वी कुस्तीपटू कोणतेही आंदोलन करणार नाहीत.'

दरम्यान, यापूर्वी कुस्तीपटूंनी अमित शाह यांच्याबरोबरही चर्चा केली होती. पण त्यांच्यादरम्यान काय झाले याबद्दल स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पण त्यानंतर 5 जून पासून साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट रेल्वेतील आपापल्या नोकरीत पुन्हा रुजू झाले आहेत. मात्र, असे असले तरी न्याय मिळेपर्यंत आंदोलन ते चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

आता पुन्हा अनुराग ठाकूर यांच्याशीही कुस्तीपटूंची भेट झाली. त्यांच्यातील चर्चेदरम्यान दिलेल्या आश्वासनामुळे कुस्तीपटूंनी आंदोलनाला स्थगिती दिली आहे.

कुस्तीपटूंनी स्विकारलेली तीव्र भूमिका

28 मे रोजी कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापटही झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंवरच गुन्हाही दाखल करण्यात आलेला.

पण यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 30 मे रोजी कुस्तीपटूंनी तीव्र भूमिका स्विकारत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मिळवलेली पदके हरिद्वारला गंगेच्या प्रवाहात विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतीय शेतकरी संघाचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी कुस्तीपटूंना 5 दिवसांची वाट पाहाण्याची विनंती केली होती.

कुस्तीपटूंनी स्विकारलेल्या या तीव्र भूमिकेनंतर अमित शाह यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली होती. त्यानंतर आता अनुराग ठाकूर यांनीही कुस्तीपटूंना १५ जूनपर्यंत कारवाईचे आश्वासन दिले आहे. आता हे प्रकरण काय वळण घेणार हे पाहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT