1983 WC Winner Support Protesting Wrestlers: 'मेडलसाठी मेहनत, त्याग अन्...', 1983 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचाही कुस्तीपटूंना पाठिंबा

ब्रिजभूषण शरण सिंग विरुद्ध अंदोलन करणाऱ्या भारतीय कुस्तीपटूंना 1983 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाकडून पाठिंबा देण्यात आला आहे.
1983 World Cup team support protesting wrestlers
1983 World Cup team support protesting wrestlersDainik Gomantak
Published on
Updated on

1983 World Cup team support protesting wrestlers: भारतीय पदक विजेते कुस्तीपटूंचे दिल्लीत कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सध्या प्रचंड चर्चेत आहे. आता या अंदोलनात 1983 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाकडूनही कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यात आला आहे.

साल 1983 मधील वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचे नेतृत्व कपिल देव यांनी केले होते, तसेच या संघात सुनील गावसकर, रॉजर बिन्नी, मोहिंदर अमरनाथ, रवी शास्त्री अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. या संघातील खेळाडूंकडून एक प्रसिद्धी पत्रक शुक्रवारी (2 जून) जाहीर करण्यात आले आहे.

यामध्ये त्यांनी अंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना पाठिंबा दिला असून त्यांनी कुस्तीपटूंनी त्यांची पदके गंगेत विसर्जित करू नये, अशी विनंतीही केली आहे.

1983 World Cup team support protesting wrestlers
Wrestlers Protest: मास्टर ब्लास्टरच्या घराबाहेर लावले पोस्टर! कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी वाढला दबाव

कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करण्याचा आरोप केलेला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी म्हणून कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. अंदोलनकर्त्या कुस्तीपटूंमध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक यांचाही समावेश आहे.

दरम्यान, 28 मे रोजी कुस्तीपटूंनी जंतरमंतर ते नवीन संसदेपर्यंत पदयात्रा काढली होती. यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता, यादरम्यान कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापटही झाल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच कुस्तीपटूंवरच गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर कुस्तीपटूंनी तीव्र भूमिका स्विकारत 30 मे रोजी गंगेच्या प्रवाहात त्यांची पदके विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतीय शेतकरी संघाचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी कुस्तीपटूंना ५ दिवसांची वाट पाहाण्याची विनंती केली आहे.

1983 World Cup team support protesting wrestlers
Wrestlers Protest: ब्रीजभूषण विरुद्ध दोन FIR दाखल! विनयभंग, लैंगिक अत्याचारासह कुस्तीपटूंनी लावले 'हे' आरोप

यानंतर कुस्तीपटूंना देशभरातून पाठिंबा मिळत असून 1983 वर्ल्डकप विजेत्या संघानेही त्यांना समर्थन देताना लिहिले की 'आमच्या चॅम्पियन कुस्तीपटूंना दिलेल्या अमानुष वागणूकीच्या दृश्याने आम्ही निराश आणि व्यथित झालो आहोत. त्यांची मेहनतीची पदके गंगा नदीत विसर्जित करण्याचा विचार ते करत असल्याचे ऐकून आम्हाला काळजी वाटली.'

'ती पदके कमावण्यामागे अनेक वर्षांची मेहनत, त्याग, समर्पण आणि हिंमत आहे आणि ती पदके फक्त त्यांची नाही, तर देशाचा अभिमान आणि आनंद आहेत. आम्ही कुस्तीपटूंना विनंती करतो की त्यांनी कोणताही असा घाईत निर्णय घेऊ नये. आम्हाला आशा आहे की त्यांच्या तक्रारी ऐकल्या जातील आणि त्यावर त्वरित कारवाईही केली जाईल. न्यायाचा विजय व्हावा.'

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने 25 जून 1983 रोजी वेस्ट इंडिजला पराभूत करत पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. त्या संघात सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचाही समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com