Wrestler Protest Dainik Gomantak
क्रीडा

Wrestlers Protest: एकेकाळी अभिमानाने मिरवलेली पदकं गंगेच्या पोटात जाणार?...रेसलर्स उद्विग्न मनस्थितीत

Pranali Kodre

Wrestlers protest throw their medals in River Ganga: भारताचे पदक विजेते कुस्तीपटूंचे दिल्लीत कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवरच गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता कुस्तीपटूंनी त्यांची भूमिका अधिक तीव्रपणे मांडताना जाहीर केले आहे की ते त्यांची पदकं हरिद्वारमध्ये गंगेत विसर्जित करणार आहेत. या आंदोलनात विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांसारखे दिग्गज कुस्तीपटू सामील झालेले आहेत.

कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करण्याचा आरोप केलेला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी म्हणून कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. पण अद्याप यावर ठोस काही निर्णय झालेला नाही.

त्यानंतर आता कुस्तीपटूंनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केले की ते मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता गंगेच्या प्रवाहात त्यांची पदके विसर्जित करणार असून इंडिया गेट येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत.

कुस्तीपटूंनी पोस्टमध्ये म्हटले आहे की 'आम्ही गंगेत पदके विसर्जित करणार आहोत, कारण ती आम्हाला आईसारखी आहेत. जेवढे पवित्र आम्ही गंगेला मानतो, तेवढ्याच पवित्रतेने आम्ही मेहनत करून पदके जिंकले होते. हे सर्व मेडल देशासाठी पवित्र आहेत आणि पवित्र पदकांना ठेवण्याची पवित्र जागाही गंगाच असू शकते.'

'पदके आमच्यासाठी आमचे प्राण आहे, आमचा आत्मा आहेत. ते गंगेत सोडल्यानंतर आमच्या जगण्यालाही काही अर्थ राहाणार नाही. त्यामुळे आम्ही इंडियावर गेटवर आमरण उपोषण करणार आहोत. इंडिया गेट आपल्या शहिदांची जागा आहे, ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणाचा त्याग केला आहे, आम्ही त्यांच्याइतके पवित्र नाही, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना आमच्या भावनाही सैनिकांप्रमाणेच असतात.'

काही दिवसांपूर्वीच विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह इतर कुस्तीपटूंवर सुरक्षा कर्मचार्‍यांना मारहाण करणे, दंगा करणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.

रविवारी कुस्तीपटूंनी जंतरमंतर ते नवीन संसदेपर्यंत पदयात्रा काढली होती. यानंतर पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, यादरम्यान कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापटही झाल्याचे पाहायला मिळाले.

या गदारोळानंतर दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर रिकामे केले, जेथे महिनाभर आंदोलन सुरू होते. तसेच विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह काही कुस्तीपटूंना ताब्यातही घेण्यात आले होते. पण नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

या सर्व घटनांनंतर अखेर कुस्तीपटूंनी त्यांच्या मागण्यांकडे राष्ट्रपती तसेच पंतप्रधानांकडूनही कोणतीही प्रतिक्रिया येत नसल्याने, तसेच या आंदोलनाकडे गंभीरतेने पाहात नसल्याने पदके गंगेत सोडण्याचा आणि आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT