Wrestlers Protest: 'कुठे येऊ गोळी खायला, शप्पथ घेऊन सांगतो...', पूर्व डीजीपीच्या इशाऱ्यावर बजरंग पुनियाचं चोख प्रत्युत्तर

Bajrang Punia And NC Asthana: अस्थाना यांनी पुनियाला इशारा दिला की, गरज पडल्यास पोलीस आंदोलक कुस्तीपटूंवर गोळीबार करतील.'
Bajrang Punia
Bajrang PuniaDainik Gomantak
Published on
Updated on

Bajrang Punia And NC Asthana: दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि केरळचे माजी पोलीस महासंचालक (DGP) एनसी अस्थाना यांच्यात सोशल मीडियावर जोरदार घमासान पाहायला मिळाले.

अस्थाना यांनी पुनियाला इशारा दिला की, 'गरज पडल्यास पोलीस आंदोलक कुस्तीपटूंवर गोळीबार करतील.' अस्थाना यांच्या ट्विटला उत्तर देताना पुनिया म्हणाला की, 'मी छातीवर गोळी खाण्यास तयार आहे.'

संपूर्ण प्रकरण समजून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उद्घाटन केलेल्या संसदेच्या नव्या इमारतीपासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंतरमंतर येथे पोलिस आणि कुस्तीपटूंमध्ये चकमक झाल्यानंतर बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि अस्थाना यांच्यात शाब्दिक वॉर रंगले.

जंतरमंतरवर निदर्शने करणारे पैलवान संसदेच्या नवीन इमारतीकडे कूच करण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान दिल्ली पोलिसांनी अनेक पैलवानांना ताब्यात घेतले.

Bajrang Punia
Wrestlers Protest : आंदोलन, संसद मार्च, धक्काबुक्की आणि एफआयआर... कुस्तीपटूंच्या आंदोलनात गेल्या २४ तासांत काय घडले?

दुसरीकडे, अनेक पैलवान आणि आंदोलकांना बसमधून वेगवेगळ्या ठिकाणी नेल्यानंतर पोलिसांनी अंदोलनस्थळी हैदोस घातला.

रविवारी रात्री एक बातमी रिट्विट करताना एनसी अस्थाना यांनी लिहिले की, "गरज पडल्यास पोलिस शूट करतील. पण तुमच्या म्हणण्यामुळे नाही.

कलम 129 पोलिसांना गोळ्या घालण्याचा अधिकार देते. (अनुकूल परिस्थितीत) तुमची ती इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होईल, परंतु हे जाणून घेण्यासाठी शिक्षित असणे आवश्यक आहे.''

दुसर्‍या ट्विटमध्ये पूर्व डीजीपी म्हणाले की, "काही मूर्ख लोक पोलिसांच्या गोळीबाराच्या अधिकारावर शंका घेतात." तुम्हाला इंग्रजी वाचता येत असेल तर अखिलेश प्रसाद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निर्णय वाचा. बायका हाकनाक विधवा होतील आणि मुले विनाकारण अनाथ होतील. तंदुरुस्त राहा.''

Bajrang Punia
Wrestlers Protest 2023: 'हो आम्ही नार्को टेस्टसाठी तयार...,' कुस्तीपटूंनी स्वीकारलं ब्रिजभूषण शरण सिंहचं आव्हान

दुसरीकडे, माजी आयपीएस अधिकारी अस्थाना यांच्या ट्विटवर आता पुनियाने प्रतिक्रिया दिली. बजरंग पुनिया हा त्या कुस्तीपटूंपैकी एक आहे, जे भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.

बजरंगने अस्थाना यांच्या ट्विटवर लिहिले की, ''हा आयपीएस अधिकारी आम्हाला गोळ्या घालण्याबाबत बोलत आहे. समोर उभा आहे भाऊ, गोळी खायला कुठं यायचं ते सांगा… मी शप्पथ घेऊन सांगतो पाठ दाखवणार नाही, छातीवर गोळी खाईन. आता आमच्याकडे एवढेच उरले आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com