Sangeeta Phogat lifts Yuzvendra Chahal on shoulders and Spins X
क्रीडा

Yuzvendra Chahal: कुस्तीपटू संगीता फोगटने खांद्यावर घेतलं अन् गरगर फिरवलं, बिचारा चहल झाला घामाघुम, पाहा Video

Sangeeta Phogat: कुस्तीपटू संगीता फोगटने चहलला खांद्यावर उचलून गोल-गोल फिरवतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Wrestler Sangeeta Phogat lifts Yuzvendra Chahal on shoulders and Spins

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल विनोदी क्रिकेटपटूंपैकी एक समजला जातो. त्याचे गमतीशीर व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. नुकताचे झलक दिखला जा या डान्स शोची व्रॅप-अप पार्टी शुक्रवारी झाली. या पार्टीदरम्यानचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे, ज्यात चहलला भारताची स्टार कुस्तीपटू संगीता फोगटने उचलले आहे.

चहलची पत्नी धनश्री वर्मा ही झलक दिखला जा या डान्स शोमध्ये सहभागी झाली होती. तसेच अंतिम फेरीत पोहचलेल्या पाच स्पर्धकांपैकी एक होती. त्यामुळे तिच्यासह चहल या शोच्या पार्टीसाठी गेला होता.

या पार्टीमध्ये कुस्तीपटू संगीता फोगटही आली होती. ती देखील या शोचा भाग होती. पण ती लवकर बाहेर पडली होती.

यावेळी संगीताने चहलला मस्तीने खांद्यावर उचलले आणि गोल-गोल फिरवले. ती त्याला गोल फिरवत असताना चहल काहीसा घाबरलेलाही दिसला. तसेच तिने जेव्हा गोल फिरवून त्याला खाली उतरवले तेव्हा त्याला काहीसे चक्कर आल्यासारखेही वाटले. या गमतीशीर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, झलक दिखला जाच्या या पार्टीमध्ये चहल-धनश्री आणि संगीता यांच्याव्यतिरिक्त अन्यही अनेक सेलिब्रेटी सामील झाले होते.

चहल भारतीय संघातून बाहेर

युजवेंद्र चहल सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयश येत आहे. गेल्यावर्षी झालेल्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतही चहलला संघात स्थान मिळाले नव्हते.

इतकेच नाही, तर चहलला बीसीसीआयने 2023-24 सालच्या वार्षिक मानधन करारातही स्थान दिलेले नाही. तो गेल्यावर्षीपर्यंत बीसीसीआयच्या करारात होता. मात्र यंदा त्याला या करारातून वगळले आहे. आता हे पाहावे लागणार आहे की चहलला आगामी टी२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळणार की नाही.

दरम्यान, चहल 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसणार आहे. तो राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT