Yuzvendra Chahal: टीम इंडियातून बाहेर असलेल्या चहलने दाखवली जादू, 'या' सामन्यात 6 खेळाडूंना केलं आऊट

Yuzvendra Chahal 6 Wickets: युझवेंद्र चहलने त्याच्या कामगिरीने टीम इंडियातील पुनरागमनासाठी पुन्हा एकदा दावा ठोकला आहे.
Yuzvendra Chahal
Yuzvendra ChahalDainik Gomantak
Published on
Updated on

Yuzvendra Chahal six wickets:

भारतात सध्या देशांतर्गत हंगाम सुरु असून विजय हजारे ट्रॉफी ही लिस्ट ए क्रिकेट स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या फेरीत ग्रुप सीमधील हरियाणा विरुद्ध उत्तराखंड यांच्यात गुरुवारी (23 नोव्हेंबर) सामना झाला.

या सामन्यात हरियाणाकडून खेळणाऱ्या युजवेंद्र चहलने शानदार कामगिरी केली आहे. त्याने तब्बल सहा विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.

या सामन्यात हरियाणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण उत्तराखंडकडून कुणाल चंडेला आणि कर्णधार जीवनज्योत सिंग यांनी सलामीला 60 धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात केली होती.

Yuzvendra Chahal
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया संघात रंगणार पाच T20 मॅचचा थरार! केव्हा अन् कुठे पाहाणार सिरीज, घ्या जाणून

मात्र, कुणालला 47 धावांवर सुमीत कुमारने बाद केले, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरील प्रियांशू खांदुरीलाही सुमीतने बाद केले. यानंतर चहल पाचवा गोलंदाज म्हणून गोलंदाजी करण्यास उतरला. त्याने 19 व्या षटकात पहिल्याच चेंडूवर जीवज्योतला २६ धावांवर माघारी धाडले.

याच स्पेलमध्ये चहलने 23 व्या षटकात स्वप्नील सिंगला 6 धावांवर आणि 25 व्या षटकात दिक्षांशू नेगीला 14 धावांवर बाद करत उत्तराखंडला मोठा धक्का दिला. त्यामुळे उत्तराखंडचा अर्धा संघ 100 धावांवरच पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

यानंतर आदित्य तारे आणि अखिल रावत यांनी उत्तरखंडला सावरले होते. त्यांनी 75 धावांची भागीदारीही केली. पण चहलने त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा हरियाणाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने 41 व्या षटकात आधी अखिलला 22 धावांवर आणि लगेचच मयंक मिश्राला शुन्यावर बाद केले. यासह त्याने 5 विकेट्सही पूर्ण केल्या.

यानंतर त्याने 47 व्या षटकात अर्धशतकी खेळी केलेल्या आदित्य तारेला 65 धावांवर बाद करत उत्तराखंडला मोठा धक्का दिला. अखेरचे दोन्ही विकेट राहुल तेवतियाने घेत 47.4 षटकात उत्तराखंडचा डाव 207 धावांवर संपवला.

त्यानंतर 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग हरियाणाने 45 षटकातच 4 विकेट्स गमावत पूर्ण केला. त्यामुळे हरियाणाने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. हरियाणाकडून युवराज सिंगने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली, तसेच अंकित कुमारने 49 धावांची खेळी केली, तर कर्णधार अशोक मनारियाने 44 धावांन नाबाद खेळी केली.

Yuzvendra Chahal
Yuzvendra Chahal: चहलला का डावललं? नक्की कसं आहे भारतीय संघाचं वर्ल्डकपसाठी गणित, जाणून घ्या

चहलने पुनरागमासाठी दावा ठोकला दावा

दरम्यान, चहलने या सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना 2 षटके निर्धाव टाकली. तसेच त्याने 26 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीचे सध्या कौतुक होत आहे. तसेच त्याच्या या कामगिरीमुळे त्याला भारतीय संघातून डावलल्याचीही चर्चा होत आहे.

चहलला वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठीही भारतीय संघात संधी मिळाली नव्हती. तसेच त्यानंतर 23 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठीही त्याला भारतीय संघात निवडण्यात आले नाही.

या टी20 मालिकेसाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक युवा खेळाडू संघात आहेत. असे असतानाही त्याला संधी न देण्याबद्दल अनेक चाहत्यांनीही त्याला वगळल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. आता चहलनेही त्याची मैदानातील कामगिरी दाखवत पुनरागमनासाठी दावा ठोकल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com