Kashvee Gautam  Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2024 Auction: 10 लाख ते 2 कोटी! 20 वर्षीय काशवी गौतम गुजरात जायंट्समध्ये

Manish Jadhav

WPL 2024 Auction: महिला प्रीमियर लीग (WPL) च्या सीझन 2 चा लिलाव मुंबईत सुरु आहे. स्टार खेळाडू काशवी गौतम सर्वात महागडी अनकॅप्ड खेळाडू ठरली. तिला गुजरात जायंट्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले, जे मूळ किमतीपेक्षा 20 पट जास्त आहे. काशवीची बेस प्राइज 10 लाख रुपये होती. तर ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँडलाही दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले, ती सर्वात महागडी परदेशी खेळाडू आहे. आतापर्यंत 17 खेळाडूंची विक्री झाली असून, त्यापैकी 6 विदेशी आणि 11 भारतीय आहेत. आता 5 संघांमध्ये 13 खेळाडू शिल्लक आहेत, त्यापैकी 3 परदेशी खेळाडूंना खरेदी करता येईल.

काशवीने हॅटट्रिक घेतली

खरेतर, 20 वर्षीय क्रिकेटपटू काशवी गौतमने अलीकडेच लखनौ इथे बीसीसीआय वरिष्ठ महिला इंटर-झोनल टी20 ट्रॉफीमध्ये नॉर्थ इस्ट झोन विरुद्ध नॉर्थ झोनसाठी हॅटट्रिकसह पाच विकेट्स घेतल्या होत्या. या आधारावर तिची इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी 16 सदस्यीय भारत-अ महिला संघातही निवड झाली. एवढेच नाही तर तिने 2020 मध्ये बीसीसीआय महिला अंडर-19 वनडे ट्रॉफीमध्ये एका डावात सर्व 10 विकेट घेत इतिहास रचला आहे.

5 खेळाडू करोडपती

दरम्यान, लिलावात 5 खेळाडूंची किंमत 1 कोटींहून अधिक होती. काशवीच्या आधी, अनकॅप्ड वृंदा दिनेश या लिलावाची पहिली भारतीय करोडपती ठरली. यूपी वॉरियर्सने तिला मूळ किंमतीपेक्षा 13 पट जास्त देऊन 1.30 कोटी रुपयांना खरेदी केले. वृंदाची बेस प्राइज 10 लाख रुपये होती. सदरलँड, वृंदा आणि काशवी यांच्याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या फोबी लिचफिल्ड (1 कोटी) आणि दक्षिण आफ्रिकेच्या शबनीम इस्माईल (1.20 कोटी) यांनाही लिलावात 1 कोटींहून अधिक रक्कम मिळाली. लिचफिल्डला गुजरातने तर शबनिमला मुंबईने विकत घेतले.

करोडपती खेळाडू

परदेशी खेळाडू- अॅनाबेल सदरलँड (DC), शबनिम इस्माईल (MI), फोबी लिचफिल्ड (GG), कॅट क्रॉस (RCB), जॉर्जिया वेअरहम (RCB) आणि डॅनी व्याट (UPW).

भारतीय खेळाडू- काशवी गौतम (GG), वृंदा दिनेश (UPW), एकता बिश्त (RCB), मेघना सिंग (GG), त्रिशा पूजा (GG), अपर्णा मंडल (DC), सायमा ठाकूर (UPW), अमनदीप कौर (MI), एस सजना (MI), पूनम खेमनार (UPW) आणि प्रिया मिश्रा (GG)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT