WPL 2023 | WPL Auction Dainik Gomantak
क्रीडा

WPL Auction 2023: तब्बल 7 जणींना 2 कोटींहून अधिक रकमेची बोली, पाहा सर्वात महागडे 10 खेळाडू

पहिल्या वूमन्स प्रीमियर लीगच्या लिलावात सर्वात महागड्या ठरलेल्या 10 खेळाडूंबद्दल जाणून घ्या

Pranali Kodre

WPL Auction 2023: महिला आयपीएल म्हणजे वूमन्स प्रीमियर लीगला यावर्षापासून सुरुवात होत आहे. पहिल्याच डब्ल्यूपीएल हंगामाची तयारी जोरदार सुरू असून 13 फेब्रुवारीला मुंबईत लिलावही पार पडला. या लिलावात अनेक भारतीय आणि परदेशी खेळाडूंना कोट्यवधी रुपयांची बोली लागली.

या लिलावात मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, युपी वॉरियर्स हे पाचही फ्रँचायझी चांगलेच व्यस्त दिसले. त्यांचा आपापले संघ सर्वोत्तम तयार करण्यावर भर होता. त्यामुळे अनेकदा हे संघ मोठ्या रकमेची बोली लावतानाही दिसले.

या लिलावासाठी 448 खेळाडूंचा समावेश होता. यातील एकूण 87 खेळाडूंवर पाच फ्रँचायझींनी मिळून बोली लावली आहे. या 87 खेळाडूंमध्ये 30 परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. या एकूण 87 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी पाच फ्रँचायझींनी मिळून 59 कोटी 50 लाख रुपये खर्च केले.

डब्ल्यूपीएलच्या पहिल्या लिलावासाठी प्रत्येक फ्रँचायझीला 12 कोटींपर्यंत खर्च करता येणार होता. तसेच प्रत्येक फ्रँचायझीला कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त 18 खेळाडू संघात सामील करायचे होते. त्यानुसार समीकरण जुळवून प्रत्येक फ्रँचायझीने आपला संघ तयार केला आहे. या दरम्यान पाचही फ्रँचायझींनी काही स्टार खेळाडूंवर कोट्यवधी रुपये देखील खर्च केले आहेत.

या लिलावात एकूण 3 खेळाडूंना 3 कोटींच्या वर बोली लागली आहे. यात सर्वाधिक बोली भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाला लागली असून तिला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने 3.40 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

तसेच ऍश्ले गार्डनरसाठी गुजरात जायंट्सने आणि नतालिया स्किव्हरसाठी मुंबई इंडियन्सने प्रत्येकी 3.20 कोटींची बोली लावली. त्यामुळे या तिघी डब्ल्यूपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडू ठरल्या. या लिलावात एकूण 7 खेळाडूंना 2 कोटींहून अधिकची बोली लागली.

पहिल्या डब्ल्यूपीएलसाठी संघ तयार करताना मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स या संघाने सर्व 12 कोटी रुपये खर्च केले. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून 12 कोटींमधील 10 लाख रुपये, गुजरात जायंट्सकडे 5 लाख रुपये आणि दिल्ली कॅपिटल्सकडे 35 लाख रुपये शिल्लक राहिले.

डब्ल्यूपीएल 2023 लिलावातील सर्वात महागडे 10 खेळाडू

1. स्मृती मानधना (3.40 कोटी) - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

2. ऍश्ले गार्डनर (3.20 कोटी) - गुजरात जायंट्स

3. नतालिया स्किव्हर (3.20 कोटी) - मुंबई इंडियन्स

4. दीप्ती शर्मा (2.60 कोटी) - युपी वॉरियर्स

5. जेमिमाह रोड्रिग्ज (2.20 कोटी) - दिल्ली कॅपिटल्स

6. बेथ मुनी (2 कोटी) - गुजरात जायंट्स

7.शफाली वर्मा (2 कोटी) - दिल्ली कॅपिटल्स

8. पुजा वस्त्राकर (1.90 कोटी) - मुंबई इंडियन्स

9. ऋचा घोष (1.90 कोटी) - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

10. सोफी एक्लेस्टोन (1.80 कोटी) - युपी वॉरियर्स

11. हरमनप्रीत कौर (1.80 कोटी) - मुंबई इंडियन्स

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT