RCB
RCB Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2024 Points Table: मुंबई इंडियन्सचा पराभव अन् स्मृतीच्या RCB ला फायदा; पॉइंट टेबलमध्ये मारली बाजी

Manish Jadhav

WPL 2024 Points Table:

महिला प्रीमियर लीग 2024 चा सहावा सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना बुधवारी (28 फेब्रुवारी) बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 6 बाद 161 धावा केल्या होत्या. यूपीला 162 धावांचे लक्ष्य मिळाले होते.

दरम्यान, यूपी वॉरियर्सने स्पर्धेतील 6 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 7 गडी राखून पराभव करत आपल्या विजयाचे खाते उघडले. दुसरीकडे, स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पॉइंट टेबलमध्ये मुंबईच्या पराभवाचा मोठा फायदा झाला आहे. आरसीबीने प्रथमच पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे, तर या पराभवानंतर मुंबई इंडियन्सची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे MI चा नेट रन रेट निगेटिव्हमध्ये गेला आहे.

तसेच, मुंबई इंडियन्स विरुद्धच्या विजयाने यूपी वॉरियर्सने पॉइंट टेबलमध्ये आपले खाते उघडले आहे. आता WPL 2024 मध्ये सहभागी होणाऱ्या 5 संघांपैकी गुजरात जायंट्स हा एकमेव संघ आहे, ज्याचे खाते अद्याप उघडलेले नाही. सलग दोन सामने गमावल्यानंतर यूपीचा हा पहिला विजय आहे.

या मोसमात यूपीचा पहिला सामना आरसीबीविरुद्ध झाला, जिथे त्यांना 2 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) त्यांचा 9 गडी राखून पराभव केला. मात्र, तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सिलसिला मोडून मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि गुणतालिकेत आपले खाते उघडले. या विजयानंतर यूपी चौथ्या स्थानावर आहे.

कसा झाला मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स सामना?

दुसरीकडे, निगल्समुळे हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यूपीविरुद्धचा सामना खेळू शकली नाही. तिच्या जागी संघाची वरिष्ठ खेळाडू नेट सायव्हर ब्रंटने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. या सामन्यात यूपीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.

पहिल्या दोन सामन्यात एमआयच्या फलंदाजांनी हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीतही शानदार फलंदाजी केली. मुंबईने यूपीविरुद्ध 161 धावा काढल्या. संघाच्या सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

यूपीने 162 धावांचे लक्ष्य 16.3 षटकात 7 गडी बाकी असताना पूर्ण केले. सलामीवीर किरण नवगिरेने 31 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 57 धावांची शानदार खेळी केली. या खेळीसाठी तिला 'प्लेअर ऑफ द मॅच' चा पुरस्कारही देण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT