WPL 2024: चिन्नास्वामीवर स्मृती अन् मेघनाचं वादळ; गुजरात जायंट्सचा 8 विकेट्सने दारुण पराभव

WPL 2024, Royal Challengers Bangalore vs Gujarat Giants: या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत सात विकेट गमावत अवघ्या 107 धावा केल्या होत्या.
Smriti Mandhana
Smriti MandhanaDainik Gomantak

WPL 2024, Royal Challengers Bangalore vs Gujarat Giants: महिला प्रीमिअर लीगचा पाचवा सामना बंगळुरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. विशेषत: गुजरात जायंट्सला लीगमध्ये आपला पहिला विजय नोंदवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत करणे आवश्यक होते.

दरम्यान, या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत सात विकेट गमावत अवघ्या 107 धावा केल्या होत्या. गुजरातने आरसीबीला विजयासाठी 108 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, स्मृती मानधाना, मेघना आणि अॅलिस पेरीच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात जायंट्सचा 8 विकेट्सने दारुण पराभव केला. आरसीबीने 12.3 षटकात 2 बाद 110 धावा करत सामना जिंकला. बंगळुरुचा हा सलग दुसरा विजय आहे. तर गुजरातचा हा सलग दुसरा पराभव आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने महिला प्रीमियर लीग 2024 (WPL 2024) मधील त्यांच्या पहिल्या सामन्यात यूपी वॉरियर्सचा पराभव केला होता, तर गुजरात जायंट्सला मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

Smriti Mandhana
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजाला 'ती' चूक पडली महागात, WPL 2024 मध्ये पहिल्यांदाच ठोठावला दंड
Smriti Mandhana
WPL 2024: शफाली-लॅनिंगचा जलवा; दिल्ली कॅपिटल्सने नोंदवला पहिला विजय; यूपी वॉरियर्सचा सलग दुसरा पराभव

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या गुजरात जायंट्सची पुन्हा एकदा खराब सुरुवात झाली. गुजरात जायंट्ससाठी दयालन हेमलताने सर्वाधिक नाबाद 31 धावा केल्या. हरलीन देओलने 22 आणि स्नेह राणाने 12 धावा केल्या. या तिघींशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूला दुहेरी आकडा पार करता आला नाही. वेदा कृष्णमूर्ती नऊ धावा करुन बाद झाली, कर्णधार बेथ मुनीने आठ धावा, अश्ले गार्डनरने सात धावा, फोबी लिचफिल्डने पाच धावा आणि कॅथरीन ब्रायर्सने तीन धावा केल्या. तनुजा कंवरने नाबाद चार धावा केल्या. आरसीबीकडून सोफी मोलिनक्सने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर रेणुका सिंह ठाकूरने दोन विकेट्स घेतल्या. जॉर्जिया वेरहॅमने एक विकेट घेतली.

दुसरीकडे, प्रत्युत्तरात 108 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची दमदार सुरुवात झाली. स्मृती मानधाना आणि सोफी डिव्हाईन यांच्यात पहिल्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी झाली. सोफी 6 धावा करुन बाद झाली. स्मृतीने 27 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 43 धावांची आक्रमक खेळी खेळली. त्यानंतर फलंदाजी आलेल्या मेघनाने 28 चेंडूत 36 धावा केल्यानंतर नाबाद राहिली. तिने आपल्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार मारला. अॅलिस पेरीने 14 चेंडूत नाबाद 23 धावा केल्या. तिने आपल्या खेळीत चार चौकार मारले. गुजरात जायंट्सकडून ॲश्ले गार्डनर आणि तनुजा कंवर यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com