WPL 2023 Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: दुसऱ्या सिजनसाठी तयारी सुरू! MI, RCB सह पाचही संघांकडून रिटेन खेळाडूंची नावे जाहीर

WPL 2023 Player Retention List: वूमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामापूर्वी पाचही संघांनी आपल्या संघातील कायम केलेल्या आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

Pranali Kodre

WPL 2023 Player Retention List:

भारतात 2023 साली पहिल्यांदाच 5 संघांमध्ये वूमन्स प्रीमियर लीग खेळवण्यात आली. या लीगच्या पहिल्याच हंगामाला चाहत्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळाला. आता 2024 मध्ये या लीगचा दुसरा हंगाम होणार आहे. या हंगामासाठी होणाऱ्या लिलावाआधी पाचही संघांनी त्यांच्या संघात कायम केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

डब्ल्यूपीएल 2024 स्पर्धेसाठी संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची नावे सुपूर्त करण्याची 15 ऑक्टोबर शेवटची तारिख होती. त्यानुसार आता दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि युपी वॉरियर्स या पाचही संघांनी आपल्या संघातून मुक्त केलेल्या आणि संघात कायम केलेल्या खेळाडूंची माहिती दिली आहे.

दरम्यान, पाचही संघांनी मिळून एकूण 60 खेळाडू कायम केले आहेत. यामध्ये 21 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर एकूण 29 खेळाडूंना मुक्त करण्यात आले आहे.

सर्व संघातील कायम केलेले आणि मुक्त केलेले खेळाडू

  • दिल्ली कॅपिटल्स - (संघात रिक्त जागा - 3)

    • संघात कायम केलेले खेळाडू - ऍलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, मारिझान कॅप, मेग लॅनिंग, मिन्नू मणी, पूनम यादव, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया, तितास साधू.

    • संघातून मुक्त केलेले खेळाडू - अपर्णा मोंडल, जसिया अख्तर, तारा नॉरिस

  • मुंबई इंडियन्स - (संघात रिक्त जागा - 5)

    • संघात कायम केलेले खेळाडू - अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेली मॅथ्यूज, हुमैरा काझी, इसाबेल वोंग, जिंतीमनी कलिता, नताली स्कायव्हर, पूजा वस्त्राकर, प्रियांका बाला, सायका इशाक, यास्तिका भाटिया

    • संघातून मुक्त केलेले खेळाडू - धारा गुज्जर, हिदर ग्रॅहम, निलम बिश्त, सोनम यादव

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - (संघात रिक्त जागा - 7)

    • संघात कायम केलेले खेळाडू - आशा शोबाना, दिशा कासट, एलिस पेरी, हिदर नाइट, इंद्राणी रॉय, कनिका आहुजा, रेणुका सिंग, रिचा घोष, श्रेयंका पाटील, स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन

    • संघातून मुक्त केलेले खेळाडू - डेन वॅन निएकर्क, एरिन बर्न्स, कोमल झांझड, मगन शट, पूनम खमनार, प्रीती बोस, सहाना पवार.

  • गुजरात जायंट्स - (संघात रिक्त जागा - 10)

    • संघात कायम केलेले खेळाडू - ऍश्ले गार्डनर, बेथ मुनी, दयालन हेमलता, हरलीन देओल, लॉरा वोल्वार्ड, शबनम शकील, स्नेह राणा, तनुजा कंवर

    • संघातून मुक्त केलेले खेळाडू - ऍनाबेल सदरलँड, अश्विनी कुमारी, जॉर्जिया वेरेहम, हर्ले गाला, किम गर्थ, मानसी जोशी, मोनिका पटेल, पारुनिका सिसोदिया, सबिनेनी मेघना, सोफिया डंकली, सुषमा वर्मा

  • युपी वॉरियर्स - (संघात रिक्त जागा - 5)

    • संघात कायम केलेले खेळाडू - एलिसा हिली, अंजली सरवानी, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, पार्श्वी चोप्रा, राजेश्वरी गायकवाड, एस. यशश्री, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्राथ.

    • संघातून मुक्त केलेले खेळाडू - देविका वैद्य, शबनिल इस्माईल, शिवाली शिंदे, सिमरन शेख

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT