WPL 2023 ट्रॉफी जिंकताच मुंबई इंडियन्सच्या नावे मोठा रेकॉर्ड, 'हा' पराक्रम करणारा बनला पहिलाच संघ

मुंबई इंडियन्सने पहिली वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धा जिंकताच मोठा कारनामाही आपल्या नावे केला आहे.
Mumbai Indians
Mumbai IndiansDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Indians Won WPL 2023: रविवारी पहिल्या वहिल्या वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने 7 विकेट्सने विजय मिळवला आणि विजेतेपदाच्या ट्रॉफीवरही नाव कोरले. याबरोबरच मुंबई इंडियन्सच्या नावावर मोठा विक्रम झाला.

मुंबई इंडियन्स हा पहिला असा संघ ठरला ज्यांनी इंडियन प्रीमियर लीग, वूमन्स प्रीमियर लीग आणि चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वाधिक विजेतेपद जिंकणारा संघ आहे. त्यांनी आत्तापर्यंत 5 आयपीएल विजेतीपदे जिंकली आहेत.

मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशी पाच विजेतीपदे मिळवली आहेत. तसेच मुंबई इंडियन्सने चॅम्पियन्स लीग टी20 स्पर्धेचे 2011 आणि 2013 सालचे विजेतेपदही पटकावले आहे. आता वूमन्स प्रीमियर लीगचे विजेतेपदही त्यांना मिळाले आहे.

Mumbai Indians
WPL 2023: ऑरेंज कॅप लेनिंगला, तर पर्पल कॅप मॅथ्यूजला; पाहा शर्यतीत राहिलेल्या टॉप 5 जणींची लिस्ट

मुंबई इंडियन्सच्या महिलांचे पहिले विजेतेपद

दरम्यान, मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ ठरला, ज्यांनी वूमन्स प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्लीने 132 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून नतालिया स्किव्हर ब्रंटने नाबाद अर्धशतकी खेळी केली. तिला कर्णधार हरमनप्रीत कौरची चांगली साथ मिळाली.

नतालिया आणि हरमनप्रीतमध्ये तिसऱ्या विकेटसाठी झालेली 72 धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली. तसेच हरमनप्रीत 37 धावावंर धावबाद झाल्यानंतरही नतालियाने संयम ढळू न देता एमेलिया केरला बरोबरीला घेत मुंबईला विजयापर्यंत पोहचवले.

नतालियाने 55 चेंडूत नाबाद 60 धावांची खेळी केली. तसेच एमेलिया 14 धावांवर नाबाद राहिली. दिल्लीकडून राधा यादव आणि जेस जोनासन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Mumbai Indians
WPL 2023: मुंबई-दिल्लीला कोटींचे बक्षीस, तर पुरस्कार विजेतेही लखपती; संपूर्ण लिस्ट पाहा एका क्लिकवर

तत्पूर्वी दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दिल्लीच्या नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्या. त्यामुळे एका क्षणी दिल्लीची अवस्था 9 बाद 79 धावा अशी झाली होती.

पण दिल्लीकडून अखेरच्या विकेटसाठी शिखा पांडे आणि राधा यादव यांनी नाबाद 52 धावांची भागीदारी केली आणि दिल्लीला 20 षटकात 9 बाद 131 धावांपर्यंत पोहचवले. शिखाने 17 चेंडूत नाबाद 27 धावांची खेळी केली, तर राधाने 12 चेंडूत 27 धावांची नाबाद खेळी केली.

तसेच त्यापूर्वी दिल्लीची कर्णधार मेग लेनिंगने 35 धावांची खेळी केली होती. मुंबईकडून इजी वाँग आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच एमेलिया केरने 2 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com