Pheba Litchfield Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2024 Auction: गुजरात जायंट्सने ऑस्ट्रेलियन महिला दिग्गजासाठी मोजले 1 कोटी; वेदा कृष्णमूर्ती अनसोल्ड

WPL 2024 Auction: महिला प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी आज, शनिवारी (9 डिसेंबर) मुंबईत एकूण 165 खेळाडूंचा लिलाव सुरु झाला आहे.

Manish Jadhav

WPL 2024 Auction: महिला प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी आज, शनिवारी (9 डिसेंबर) मुंबईत एकूण 165 खेळाडूंचा लिलाव सुरु झाला आहे. ज्यामध्ये गुजरात जायंट्सने कांगारु महिला संघाची दिग्गज क्रिकेटपटू फीबा लिचफिल्डला 1 कोटी रुपयांना त्यांच्या संघाचा भाग बनवले. ही आजची पहिली बोली आहे. आता गुजरातच्या पर्समध्ये 4.95 कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. लिलावाच्या यादीत 104 भारतीय आणि 61 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे, त्यापैकी 15 खेळाडू सहयोगी देशांचे आहेत. पाच संघांमध्ये फक्त 30 जागा शिल्लक आहेत. यापैकी परदेशी खेळाडूंसाठी फक्त 9 स्लॉट उपलब्ध आहेत. 21 विदेशी महिला खेळाडूंसह 60 क्रिकेटपटूंना पाच फ्रँचायझींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या सध्याच्या संघातून 29 खेळाडूंना रिलीज करण्यात आले आहे.

पहिला सेट- पहिली बोली 1 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली, 9 पैकी 2 खेळाडू विकले गेले

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या फोबी लिचफिल्डच्या नावाने लिलाव सुरु झाला. तिची मूळ किंमत 30 लाख होती. लिचफिल्डला गुजरात जायंट्सने एक कोटी रुपयांना विकत घेतले. लिचफिल्डसाठी गुजरात आणि यूपीने बोली लावली. मात्र अखेर, यामध्ये गुजरातने बाजी मारत लिचफिल्डरला आपल्या संघाचा भाग बनवले. लिचफिल्ड व्यतिरिक्त, इंग्लंडच्या डॅनी व्याटला यूपी वॉरियर्सने 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. पहिल्या सेटचे उर्वरित खेळाडू विकले गेले नाहीत. यापैकी वेदा कृष्णमूर्ती, पूनम राऊत आणि मोना मेस्राम अनसोल्ड राहिले. पहिल्या सेटमध्ये 9 खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली होती, मात्र केवळ 2 खेळाडूंना खरेदी करण्यात आले.

गुजरात जायंट्सची पर्समध्ये मोठी रक्कम

दुसरीकडे, एका संघात किमान 15 आणि कमाल 18 खेळाडू असू शकतात. डब्ल्यूपीएल लिलावामधील संघांची पर्स मर्यादा देखील केवळ 15 कोटी रुपये आहे, म्हणजे संघ खेळाडू खरेदी करण्यासाठी 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करु शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT