Ravi Kumar Dahiya Dainik Gomantak
क्रीडा

Wrestling Championship: सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू रवी दहिया स्पर्धेतून आऊट

Ravi Kumar Dahiya: बेलग्रेडमध्ये खेळल्या जात असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी भारताला मोठा धक्का बसला.

दैनिक गोमन्तक

Wrestling Championship: बेलग्रेडमध्ये खेळल्या जात असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी भारताला मोठा धक्का बसला. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू रवी दहिया 57 किलो वजनी गटात प्री-क्वार्टर फाइनलमध्ये पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडला आहे. जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या दहियाला उझबेकिस्तानचा कुस्तीपटू गुलोमजोन अब्दुल्लाएव याने तांत्रिक कौशल्याच्या जोरावर 10-0 ने पराभूत केले.

दरम्यान, रवी दहियाला (Ravi Kumar Dahiya) कोणत्याही पदकाशिवाय परतावे लागणार आहे. त्यामुळे रवीला रिपेचेज फेरीही खेळता येणार नाही. रविने पात्रता फेरीत रोमानियाच्या (Romania) राजवान मारियन कोव्हाक्सचा 10-0 ने पराभव केला होता.

त्याचवेळी, राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू नवीनची कांस्यपदकासाठी किर्गिस्तानच्या अरनाझर अकमातलीव्हशी लढत होईल. रिपेचेजमध्ये नवीनचा सामना कझाकिस्तानच्या सिरबाज तलगटशी झाला होता. नवीनने हा सामना 11-3 असा जिंकला होता. यानंतर उझबेकिस्तानचा (Uzbekistan) लियास बेकबुलाटोव्ह दुखापतीमुळे पुढील सामन्यात खेळू शकला नाही. अशा स्थितीत नवीनला वॉकओव्हर देण्यात आला आणि तो कांस्यपदकाच्या लढतीत पोहोचला.

याआधी, महिला कुस्तीपटू विनेश फोगटने बेलग्रेड येथे सुरु असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. जागतिक चॅम्पियनशिपमधील हे तिचे दुसरे पदक होते. यापूर्वी तिने नूर सुलतान वर्ल्ड चॅम्पियनशिप 2018 मध्ये कांस्यपदक जिंकले होते. विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोन पदके जिंकणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. तिने 53 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत स्वीडनच्या जोना माल्मग्रेनचा 8-0 असा पराभव करुन कांस्यपदक जिंकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT