Team India Dainik Gomantak
क्रीडा

WTC Point Table: दक्षिण आफ्रिका हारली अन् फटका टीम इंडियाला बसला; न्यूझीलंडची पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप

Team India: दक्षिण आफ्रिका सध्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. जिथे पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 281 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

Manish Jadhav

WTC Point Table Update:

दक्षिण आफ्रिका सध्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. जिथे पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 281 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह, न्यूझीलंडने मोठी झेप घेत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 (World Test Championship 2023-25) ​​गुणतालिकेत पहिले स्थान गाठले आहे.

न्यूझीलंडच्या विजयानंतर भारताला टॉप 2 मधून बाहेर पडावे लागले. खरे तर, दक्षिण आफ्रिकेच्या न्यूझीलंड दौऱ्यातील पहिला कसोटी सामना माउंट माउंगानुई स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 529 धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ चौथ्या डावात केवळ 247 धावांत गारद झाला. या मोठ्या विजयानंतर न्यूझीलंडला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 च्या गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे.

न्यूझीलंडने अव्वल स्थान गाठले

दक्षिण आफ्रिकेचा 281 धावांनी पराभव केल्यानंतर, न्यूझीलंडने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 ​​गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एक स्थान गमावले आहे. न्यूझीलंड सध्या गुणतालिकेत 66.66 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 55 गुणांच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. आस्ट्रेलियाने आत्तापर्यंत 10 सामने खेळले आहेत, ज्यात 6 जिंकले आहेत. तर भारत 6 पैकी 3 सामने जिंकून 52.77 गुणांच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या दक्षिण आफ्रिका संघातील जवळपास सर्वच खेळाडू अननुभवी आहेत. त्यांचे स्टार फलंदाज सध्या दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या SA T20 लीगमध्ये भाग घेत आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला हा संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर पाठवावा लागला होता. जेव्हा दक्षिण आफ्रिकेने या संघाची घोषणा केली. त्यावेळी निवडकर्त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. नंतर एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, जर आम्ही आमचे सर्व स्टार खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यावर पाठवले तर SA T20 लीग पाहण्यासाठी कोण येईल. त्यानंतर त्याला आपला संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर पाठवावा लागला.

अशी या सामन्याची स्थिती होती

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात माउंट माउंगानुई स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना रचिन रवींद्रचे द्विशतक आणि केन विल्यमसनच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 511 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात अवघ्या 162 धावांवर आटोपला.

दुसऱ्या डावात केन विल्यमसनने न्यूझीलंडसाठी आणखी एक शतक झळकावले आणि दक्षिण आफ्रिकेला 529 धावांचे कठीण लक्ष्य दिले. मात्र, 529 धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला केवळ 247 धावा करता आल्या आणि पहिल्या कसोटीत 281 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

तिसऱ्या कसोटीत भारताला अव्वल स्थानी येण्याची संधी

भारत (India) आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. जर भारताने तिसरा कसोटी सामना जिंकला तर ते जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 ​​गुणतालिकेत अव्वल 2 मध्ये स्थान मिळवेल. आणि या काळात ऑस्ट्रेलियाला आपले दुसरे स्थान गमवावे लागणार आहे. भारताच्या पहिल्या दोन सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, पहिली कसोटी इंग्लंडच्या नावावर होती. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत भारताने शानदार पुनरागमन करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: इंग्लंडला डबल झटका! आधी कांगारुंनी मैदानात दिली मात, नंतर WTC पॉइंट टेबलमध्ये झाली घसरण; जाणून घ्या भारताची सध्याची स्थिती

गोव्यात जमीनमालकांना झटका! मुंडकारांना हक्क मिळेपर्यंत जमिनीची विक्री होणार नाही; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Shani Gochar: 2026 नव्हे 2027 मध्ये होणार शनिदेवाचे राशी परिवर्तन, 'या' 5 राशींना राहावं लागणार सावधान; आरोग्य, धन आणि संबंधांवर थेट परिणाम!

Baba Vanga Predictions: 2026 मध्ये 'या' 5 राशीचे लोक होणार मालामाल, बाबा वेंगांची 'अफाट धनलाभा'ची भविष्यवाणी; शनिदेवाची राहणार कृपा!

IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

SCROLL FOR NEXT