World Cup 2023 | India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

World Cup Tickets: वर्ल्ड कपच्या तिकिटांनी वाढवलं टेन्शन, वेबसाइट क्रॅश होत असल्याने चाहत्यांचा संताप

World Cup Tickets: भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या तिकिटांची विक्री 5 ऑक्टोबरपासून सुरु आहे.

Manish Jadhav

World Cup Tickets: भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या तिकिटांची विक्री 5 ऑक्टोबरपासून सुरु आहे. बीसीसीआयने ठरवलेल्या नियमांनुसार वेगवेगळ्या सामन्यांची तिकिटे वेगवेगळ्या तारखांना उपलब्ध होतील.

14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या सामन्याची तिकिटे काही वेळातच विकली गेली. मात्र, ही केवळ पहिली फेरी असून प्रेक्षकांना दुसऱ्या फेरीत तिकीट खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

पहिल्या फेरीदरम्यान तिकीट खरेदी करण्याचा चाहत्यांचा अनुभव फारसा चांगला नव्हता. वारंवार वेबसाईट क्रॅश होत असल्याने ते खूप अस्वस्थ झाले होते.

दरम्यान, एकदिवसीय विश्वचषकाच्या तिकिटांची विक्री शुक्रवारपासून (25 ऑगस्ट) सुरु झाली. पहिल्या दिवसाचे पहिले काही तास क्रिकेट चाहत्यांसाठी चांगले नव्हते.

विश्वचषकाच्या तिकिटांसाठी Tay ची अधिकृत वेबसाइट लॉन्च होताच क्रॅश झाली. 35 ते 40 मिनिटे संकेतस्थळ सुरु न राहिल्याने क्रीडाप्रेमींना तिकीट काढताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. ही स्थिती अजूनही कायम आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली

वेबसाईट सतत क्रॅश होत असल्याने चाहत्यांमध्ये नाराजी वाढत आहे. भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे खरेदी करतानाही प्रेक्षकांना अडचणींचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर (Social Media) त्यांनी संताप व्यक्त केला.

तिकीट काढण्यात अडचण आल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. क्रिकेट चाहत्यांनी आयसीसी, बीसीसीआयला टॅग करत ट्विट करुन तिकीट न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच विकली गेली

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या महामुकाबल्यासाठी आता दुसऱ्या फेरीचे बुकिंग 3 सप्टेंबरला होणार आहे. यावेळी, चाहत्यांना उर्वरित तिकिटे खरेदी करण्याची संधी असेल.

भारताच्या (India) सामन्यांची किती तिकिटे ऑनलाइन विक्रीसाठी ठेवण्यात आली होती हे माहीत नाही. मंगळवारी (29 ऑगस्ट) भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरु झाली, तेव्हा तासाभरातच सर्व तिकिटे विकली गेली.

एका चाहत्याला दोन तिकिटे खरेदी करण्याची परवानगी होती

पीटीआय या वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, “मंगळवारी ज्या प्रेक्षकांकडे मास्टरकार्ड आहे त्यांनाच तिकीट मिळाले. एका चाहत्याला फक्त दोन तिकिटे खरेदी करता आली. विक्री सुरु झाल्यानंतर तासाभरातच सर्व तिकिटे विकली गेली. तिकीट विक्रीची पुढील फेरी 3 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT