World Cup 2023 Tickets: उत्सुकता शिगेला! तिकीट विक्रीबाबत चाहत्यांसाठी BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

World Cup 2023 Tickets: भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सामन्यांची तिकीट विक्री कधी सुरू होणार आहे, जाणून घ्या.
World Cup 2023 Tickets
World Cup 2023 TicketsDainik Gomantak

ICC Men’s Cricket World Cup 2023 Tickets Details: भारतात वर्ल्डकप 2023 स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता असून तिकिटांची विक्री सुरु होण्याच्या प्रतिक्षा सर्वांना आहे. याबद्दल आता बीसीसीआयकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

बीसीसीआयने 23 ऑगस्ट रोजी बुक माय शोची वर्ल्डकप 2023 तिकिटांची ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी अधिकृत तिकिटींग प्लॅटफॉर्म म्हणून घोषणा केली आहे.

वर्ल्डकप 2023 मुख्य स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पण त्याआधी 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने खेळवले जाणार आहेत.

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 10 सराव सामने आणि मुख्य स्पर्धेतील 48 सामने असे मिळून एकूण 58 सामने 12 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.

World Cup 2023 Tickets
ODI World Cup 2023 Schedule: सराव सामन्यांचे वेळापत्रक घोषित! भारत 'या' दोन संघाविरुद्ध करणार अंतिम तयारी

त्यामुळे टप्प्याटप्प्याने 25 ऑगस्टपासून तिकिट विक्रीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, 15 ऑगस्टपासून आयसीसीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर तिकिटांसाठी नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती, ज्यामुळे त्यांना वर्ल्डकपसाठी जागा पक्की करण्यासाठी मदत होईल.

दरम्यान, ज्या टप्प्याने तिकिटविक्री होणार आहे, त्याच्या एक-एक दिवस आधी प्री-सेल सुरु होणार आहे. प्री सेलमध्ये केवळ आयसीसीचा व्यावसायिक भागीदार, मास्टरकार्डसाठी नियुक्त केलेल्या 24-तास विंडोचा समावेश आहे.

वर्ल्डकप 2023 मधील तिकिटांच्या प्री-सेलचे वेळापत्रक

 • 24 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजल्यापासून - मास्टरकार्ड प्री-सेल - सराव सामने वगळता भारताव्यतिरिक्त सर्व सामने

 • 29 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजल्यापासून - मास्टरकार्ड प्री-सेल - सराव सामने वगळता सर्व भारताचे सामने

 • 14 सप्टेंबर संध्याकाळी 6 वाजल्यापासून - मास्टरकार्ड प्री-सेल - उपांत्य फेरी आणि अंतिम सामना

वर्ल्डकप 2023 स्पर्धेची तिकिट विक्रीचे वेळापत्रक

 • 25 ऑगस्ट रात्री 8 वाजल्यापासून - भारताव्यतिरिक्त सराव सामने आणि भारताव्यतिरिक्त सामने

 • 30 ऑगस्ट रात्री 8 वाजल्यापासून - गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरमला होणारे भारताचे सामने

 • 31 ऑगस्ट रात्री 8 वाजल्यापासून - चेन्नई, दिल्ली आणि पुणे येथे होणारे भारताचे सामने

 • 1 सप्टेंबर रात्री 8 वाजल्यापासून - धरमशाला, लखनऊ आणि मुंबई येथे होणारे भारताचे सामने

 • 2 सप्टेंबर रात्री 8 वाजल्यापासून - बंगळुरू आणि कोलकाता येथे होणारे भारताचे सामने

 • 3 सप्टेंबर रात्री 8 वाजल्यापासून - अहमदाबादला होणारे भारताचे सामने

 • 15 सप्टेंबर रात्री 8 वाजल्यापासून - उपांत्य आणि अंतिम सामने

भारतीय संघाचे सामने

वर्ल्डकप 2019 मधील अंतिम सामन्यात पोहचलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघातील सामन्यानेच अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर 5 ऑक्टोबरला 2023 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी भारतीय संघ पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल.

त्यानंतर भारतीय संघ 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल. तसेच बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अहमदाबादला 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर चार दिवसांनी म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी भारतीय संघ पुण्यामध्ये बांगलादेशविरुद्ध सामना खेळणार आहे.

तसेच भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना 22 ऑक्टोबर रोजी धरमशाला येथे खेळवली जाईल. त्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि भारताचा सामना लखनऊला होणार आहे, तर 2 नोव्हेंबर रोजी भारतीय संघ श्रीलंका संघाविरुद्ध मुंबईत खेळेल.

5 नोव्हेंबर म्हणजेच विराट कोहलीच्या वाढदिवशी भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना होणार आहे. हा सामना कोलकातामध्ये होईल, तर भारताचा अखेरचा साखळी सामना 12 नोव्हेंबर रोजी बंगळुरुला नेदरलँड्स संघाविरुद्ध होईल.

दरम्यान, मुख्य स्पर्धेतील सामन्यांपूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध गुवाहाटीला 30 स्पटेंबर रोजी सराव सामना खेळेल, तर नेदरलँड्सविरुद्ध 3 ऑक्टोबर रोजी तिरुअनंतपुरमला सराव सामना खेळेल.

World Cup 2023 Tickets
World Cup 2023: शिक्कामोर्तब झालं! भारत-पाकिस्तानसह 9 सामन्यांच्या वेळापत्रकात बदल, ICC ची घोषणा

भारतीय संघाचे 2023 वर्ल्डकपसाठी वेळापत्रक

 • 8 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

 • 11 ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

 • 14 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

 • 19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे

 • 22 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धरमशाला

 • 29 ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ

 • 2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, मुंबई

 • 5 नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

 • 12 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, बंगळुरू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com