South Africa Team  Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 Points Table: दक्षिण आफ्रिका पॉंइट टेबलमध्ये 'अव्वल', न्यूझीलंडच्या पराभवाचा कांगारुंना फायदा!

World Cup 2023 Points Table: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा 190 धावांनी पराभव केला.

Manish Jadhav

World Cup 2023 Points Table: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा 190 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकातील सात सामन्यांमधील हा सहावा विजय आहे.

न्यूझीलंडचा पराभव करुन दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारताकडून अव्वल क्रमांकाचा मुकुट हिसकावून घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

भारताचे (+1.405) सुद्धा 12 गुण आहेत, परंतु दक्षिण आफ्रिकेचा (+2.290) नेट रनरेट चांगला आहे. भारताने आपल्या सर्व 6 सामन्यांमध्ये विजयाचा झेंडा फडकावला आहे. गुरुवारी भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे.

दरम्यान, न्यूझीलंड (+0.484) च्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाला (+0.970) फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियन संघ चौथ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दोघांचे प्रत्येकी आठ गुण आहेत. न्यूझीलंडने सलग तिसरा सामना गमावला आहे.

किवी संघाने पहिले चार सामने जिंकले होते. पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तान पाचव्या आणि अफगाणिस्तान सहाव्या स्थानावर आहे. दोघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. श्रीलंका (चार गुण) सातव्या स्थानावर आणि नेदरलँड्स (चार गुण) आठव्या स्थानावर आहे.

बांगलादेश (दोन गुण) नवव्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा (Bangladesh) संघ अधिकृतपणे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. गतविजेता इंग्लंड (दोन गुण) तळाला, दहाव्या स्थानावर आहे.

न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पुण्यात नाणेफेक गमावल्यानंतर बावुमा ब्रिगेडने 357/4 अशी मोठी धावसंख्या उभारली होती. दक्षिण आफ्रिकेकडून व्हॅन डेर ड्युसेनने सर्वाधिक धावा केल्या.

त्याने 118 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 133 धावांची खेळी खेळली. क्विंटन डी कॉकने 116 चेंडूत 114 धावा जोडल्या. त्याने 10 चौकार आणि 3 षटकार मारले. डेव्हिड मिलरने 30 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांसह 53 धावा केल्या.

प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 35.3 षटकांत 167 धावांत गुंडाळला गेला. न्यूझीलंडसाठी ग्लेन फिलिप्सने (50 चेंडूत 60, चार चौकार, चार षटकार) सर्वाधिक धावा केल्या.

विल यंगने 33 आणि डॅरिल मिशेलने 24 धावांचे योगदान दिले. फिरकीपटू केशव महाराजने न्यूझीलंडच्या चार खेळाडूंची शिकार केली. तर मार्को यान्सेनने तीन बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT