World Cup 2023: भारतात या वर्षी होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ खेळणार की नाही याबाबत अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. भारताने गेल्या वर्षी आशिया चषकासाठी पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेतला होता.
तेव्हापासून आतापर्यंत पाकिस्तानकडून विश्वचषकाबाबत अनेक प्रकारच्या अटी ठेवण्यात आल्या आहेत. आता बातम्या येत आहेत की, पाकिस्तानने आयसीसीकडे लेखी आश्वासन मागितले आहे.
दरम्यान, आयसीसी एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी पाकिस्तानचा (Pakistan) संघ भारतात येणार की नाही, हे सर्व त्यांच्या सरकारच्या हातात आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सरकारला पत्र लिहून संघाला भारत दौऱ्याची परवानगी मागितली होती.
आता याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. RevSportz च्या बातमीनुसार, पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वतीने आयसीसीकडून लेखी आश्वासन मागवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीसीबी (PCB) आणि पाकिस्तान सरकारने भारतात पाकिस्तान क्रिकेट संघाला पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षेबाबत लेखी आश्वासन मागितले आहे. ते म्हणाले की, त्यांच्या संघातील खेळाडूंना भारतात उच्चस्तरीय सुरक्षा मिळेल. हे लेखी आश्वासन दिल्यानंतरच संघाला भारतात जाण्याची परवानगी दिली जाईल.
भारतात होत असलेल्या एकदिवसीय विश्वचषकातील आपल्या सामन्यांच्या ठिकाणाबाबात पाकिस्तान आधीच अडून बसला होता. पीसीबीने अहमदाबादमध्ये खेळण्यास नकार दिला.
साखळी सामन्यात खेळणार नाही, अहमदाबादमध्ये नॉटआऊट सामने झाले तर आमची काही हरकत नाही असे पाकिस्तानचे म्हणणे होते. मात्र, आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तानची ही मागणी फेटाळून लावली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.