Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: पाकिस्तान IN, बांगलादेश Out! बाबर सेनेच्या विजयाने बदलला Points Table चा खेळ

World Cup 2023 Points Table: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 31 व्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा 7 विकेट्स राखून पराभव केला आहे.

Manish Jadhav

World Cup 2023 Points Table: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 31 व्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा 7 विकेट्स राखून पराभव केला आहे. या विजयासह पाकिस्तानने उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

मात्र, त्याला टॉप-4 मध्ये स्थान मिळवणे कठीण होणार आहे. बांगलादेश संघाचा 2023 च्या विश्वचषकातील हा सहावा पराभव आहे. विशेष म्हणजे, बांगलादेशचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

2023 च्या विश्वचषकातून बाहेर पडणारा बांगलादेश पहिला संघ ठरला आहे. त्याचबरोबर पॉइंट टेबलमध्येही अनेक बदल दिसून आले आहेत.

पाकिस्तानच्या विजयानंतर पॉइंट टेबलची स्थिती

दरम्यान, बांगलादेशला (Bangladesh) पराभूत केल्यानंतर पाकिस्तान संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांचे आता 7 सामन्यांतून तीन विजयांसह 6 गुण आहेत. तर त्यांचा नेट रनरेटदेखील -0.024 आहे.

त्याचबरोबर बांगलादेशला 7 सामन्यांपैकी सहाव्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले असून ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याचे 2 गुण असून नेट रनरेट-1.446 आहे.

त्याचवेळी, इंग्लंड संघ सध्या दोन गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे, तर नेदरलँड्स आणि बांगलादेशचे संघ सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत.

टीम इंडिया अव्वल स्थानावर कायम आहे

टीम इंडिया (Team India) 12 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. टीम इंडियाचा नेट रन रेट 1.405 आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया प्रत्येकी 8 गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

याचबरोबर अफगाणिस्तानचा संघ 6 सामन्यांत 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. मात्र, नेट रनरेटमुळे तो पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानपेक्षा एक स्थान खाली आहे.

पाकिस्तानने सामन्यात मारली बाजी

या सामन्यात बांगलादेशचा संघ प्रथम फलंदाजीला आला होता. पण शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील वेगवान गोलंदाजीमुळे पाकिस्तानने बांगलादेशला 45.1 षटकांत 204 धावांत गुंडाळले.

या सामन्यात पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियर आणि शाहीन आफ्रिदीने 3-3 बळी घेतले. तर हारिस रौफने 2 विकेट्स घेतल्या. इफ्तिखार अहमद-उसामा मीर यांनीही प्रत्येकी 1 बळी घेतला.

205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फखर जमान (81 धावा) आणि अब्दुल्ला शफीक (68 धावा) यांच्या शानदार फलंदाजीमुळे पाकिस्तानने 3 गडी गमावून विजय मिळवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Thivim MIT University: थिवी विद्यापीठासाठी 1 हजार 149 झाडे तोडणार, गोवा राज्य वृक्ष प्राधिकरणाकडून मंजुरी

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

Viral Video: थरारक...! जंगल सफारीचा रोमांचक अनुभव, चिडलेल्या गेंड्याचा गाडीवर हल्ला; थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Goa Live News: सरकारी प्राथमिक शिक्षक सरकारी पतसंस्थेतर्फे निवृत्त शिक्षकांचा गौरव सोहळा

SCROLL FOR NEXT