Team India Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: सेमीफायनल पूर्वीचा शेवटचा सामना, रोहित शर्मा करणार का प्लेइंग 11 मध्ये बदल?

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक-2023 च्या साखळी टप्प्यातील शेवटचा सामना आज (रविवारी) होत आहे.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक-2023 च्या साखळी टप्प्यातील शेवटचा सामना आज (रविवारी) होत आहे. हा सामना भारतविरुद्ध नेदरलँड्स यांच्यात बंगळुरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना केवळ औपचारिकता असून भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. दुसरीकडे मात्र, नेदरलँड्स संघासाठी ही सन्मानाची लढाई असणार आहे.

दरम्यान, भारतीय संघ हा सामना जिंकला किंवा हरला तरी गुणतालिकेत अव्वल स्थानीच राहणार आहे. त्याचे 8 सामन्यांत 16 गुण आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका 9 सामन्यांत 14 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाला आपल्या प्लेइंग 11 बाबत प्रयोग करण्याची संधी आहे. संघ व्यवस्थापनाची इच्छा असेल तर ते वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊ शकतात. बराच वेळ बेंचवर बसलेल्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. तथापि, कर्णधार रोहित शर्मा संघात क्वचितच बदल करतो आणि याचा विचार करता असे म्हणता येईल की, या सामन्यातही भारतीय संघ त्याच प्लेइंग 11 बरोबर जाऊ शकतो, ज्याने आतापर्यंत विरोधी संघांना धडकी भरवली आहे.

कोहलीला संधी आहे

दुसरीकडे, या सामन्यात विराट कोहलीला वनडेतील अर्धशतकांचा विक्रम करण्याची सुवर्णसंधी आहे. कोहलीने कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कारकिर्दीतील 49 वे शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली. आता तो कारकिर्दीतील 50 वे शतक झळकावण्याच्या फक्त एक पाऊल दूर आहे. त्याने आतापर्यंत या विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक 543 धावा केल्या आहेत. कोहलीने प्रथमच 50 षटकांच्या विश्वचषकात 500 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने 2011 मध्ये 282, 2015 मध्ये 305 आणि 2019 मध्ये 443 धावा केल्या होत्या. या तीन विश्वचषकात अनुक्रमे तेंडुलकर, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी शानदार फलंदाजी केली होती. संघाच्या दृष्टिकोनातून, व्यवस्थापनाला सूर्यकुमार यादवला धावा करताना पाहायचे आहे, जो चार सामन्यांत केवळ 85 धावा करु शकला आहे. इतर सर्व आघाडीच्या फलंदाजांनी किमान एक अर्धशतक झळकावले आहे.

भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, सिराज आणि कुलदीप यादव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT