World Cup 2023: विराटला महत्त्व, तर रोहितकडे दुर्लक्ष! सोशल मीडियावर हिटमॅनच्या चाहत्यांचा राडा

Social Media Trend: वर्ल्डकप 2023 मध्ये विराटला अन्य कोणाहीपेक्षा अधिक महत्त्व दिलं जात असल्याचं म्हणत सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
Rohit Sharma | Virat Kohli
Rohit Sharma | Virat Kohli
Published on
Updated on

Fans criticised star sports for focusing Virat Kohli and Ignoring Rohit Sharma during ODI Cricket World Cup 2023:

भारतात सध्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने आत्तापर्यंत दमदार कामगिरी करत गुणतालिकेत अव्वल स्थानही पक्के असून उपांत्य फेरीतही स्थान मिळवले आहे. मात्र, असे असतानाच आता एक वाद समोर येताना दिसत आहे.

वर्ल्डकप स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण भारतात टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर केले जात आहे, तर डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवरही सामन्यांचे प्रक्षेपण होत आहे.

मात्र, भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात 12 नोव्हेंबरला बंगळुरूला होणार असलेल्या अखेरच्या साखळी सामन्यापूर्वी सोशल मीडियावर 'शेम ऑन स्टार स्पोर्ट्स (SHAME ON STAR SPORTS)' ट्रेंट होत आहे.

Rohit Sharma | Virat Kohli
Rohit Sharma: शतक हुकलं, पण रोहितने 87 धावांसह केली विराटच्या विक्रमाची बरोबरी!

यामागील कारण म्हणजे अनेक क्रिकेट चाहत्यांच्या म्हणण्यानुसार स्टार स्पोर्ट्स विराट व्यतिरिक्त भारतीय संघातील 14 खेळाडूंना महत्त्व देताना दिसत नाहीये. भारताचा कर्णधार रोहित शर्मा असूनही त्याच्यापेक्षा अधिक महत्त्व विराटला दिले जात आहे.

तसेच स्टार स्पोर्ट विराटचे ब्रँडींग करत असल्याचा आरोपही सोशल मीडिया युजर्सने केला आहे. तसचे अनेक युजर्सने म्हटले आहे की भारताच्या या यशात स्टार फलंदाज विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह अनेक खेळाडूंने योगदान राहिले आहे.

THE NADDY नावाच्या युजरने या ट्रेंड मागील कारण लिहिले की 'स्टार स्पोर्ट्स रोहित शर्माला पूर्णपणे दुर्लक्षित करून फक्त विराट कोहलीला महत्त्व देत आहेत. देशाला गौरवान्वित करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या भारतीय संघातील इतर १४ खेळाडूंनाही भारतीय चाहते पाठींबा देत आहेत. पण स्टार स्पोर्ट्स केवळ एकाच व्यक्तीच्या विक्रमांवर, लाईफस्टाईलवर अधिक फोकस करत आहे. हा दृष्टीकोन अपमानजनक आहे.'

तसेच Ayush नावाच्या एका युजरने लिहिले की स्टार स्पोर्ट्सने त्यांचे नाव बदलून कोहली टीव्ही करायला हवे.'

Rohit Sharma | Virat Kohli
'Virat Kohli स्वत:ला रोनाल्डा समजतो, पण...' धोनीनंतर आता युवराजचा कोहलीबाबत खुलासा

भारतीय संघ उपांत्य फेरीत

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत साखळी फेरीतील 8 पैकी 8 सामने जिंकले असून 16 गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. त्यामुळे भारतीय संघ उपांत्य सामना गुणतालिकेतील चौथ्या क्रमांकाच्या संघाविरुद्ध खेळणार आहे.

जर गुणतालिकेत चौथा क्रमांक न्यूझीलंडने मिळवला, तर भारतीय संघ 15 नोव्हेंबर रोजी मुंबईला उपांत्य सामना खेळेल, तसेच जर पाकिस्तानने चौथा क्रमांक मिळवला, तर 16 नोव्हेंबरला कोलकातामध्ये त्यांच्याविरुद्ध भारतीय संघ उपांत्य सामना खेळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com