Australia Team | Pat Cummins Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 मधील पहिल्या विजयानंतर कांगारु कर्णधार खूश, 'हे खरे हिरो...'

World Cup 2023: विश्वचषक 2023 मध्ये पहिला विजय नोंदवल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने आनंद व्यक्त केला.

Manish Jadhav

World Cup 2023: विश्वचषक 2023 मध्ये पहिला विजय नोंदवल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने आनंद व्यक्त केला आणि सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेला चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ न देणाऱ्या आपल्या गोलंदाजांचे कौतुक केले.

कुसल परेरा (78) आणि पाथुम निसांका (61) यांच्यातील पहिल्या विकेटसाठी 125 धावांच्या भागीदारीच्या बळावर श्रीलंका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता, पण शेवटी त्यांचा संघ 209 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने 88 चेंडू शिल्लक असताना पाच विकेट्स राखून विजय मिळवला.

पहिला विजय मिळाल्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार खूश

सामन्यानंतर कमिन्स म्हणाला की, ''त्यांची सुरुवात चांगली झाली होती, पण आमच्या गोलंदाजांनी अतुलनीय कामगिरी केली आणि त्यांनी आपली भूमिका चोख बजावली. आम्ही तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी केली.

आशा आहे की, आम्ही आगामी सामन्यांमध्येही अशीच कामगिरी करु.'' श्रीलंकेचा (Sri Lanka) कर्णधार कुसल मेंडिस म्हणाला की, 'जर आमच्या संघाने 290-300 धावा केल्या असत्या तर निकाल वेगळा असू शकला असता.'

कुसल पुढे म्हणाला की, 'आम्ही चांगली सुरुवात केली होती, पण आमची मधली फळी ढासळली. आम्ही 290 किंवा 300 धावा केल्या असत्या तर या खेळपट्टीवर चांगली धावसंख्या झाली असती. आम्ही स्ट्राइक रोटेट करु शकलो नाही. मला माझ्या फलंदाजांवर विश्वास आहे आणि ते येत्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे.''

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा (Australia) लेगस्पिनर अॅडम झाम्पाने चार विकेट घेतल्या आणि त्याला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. यावेळी बोलताना झाम्पा म्हणाला की, 'खरं सांगायचं तर माझी तब्येत ठीक नव्हती. पण आज मी चांगली गोलंदाजी केली. गेल्या सामन्यात मला चांगली गोलंदाजी करता आली नव्हती.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

SCROLL FOR NEXT