IND vs NZ Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड टीम इंडियावर भारी, 20 वर्षांपासून किवीचा एकदाही पराभव नाही; रोहित ब्रिगेड...

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये रविवारी भारतविरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. धरमशालेच्या मैदानावर दोघांमध्ये टक्कर होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड या स्पर्धेत विजयाच्या रथावर स्वार आहेत.

दोघांनी आतापर्यंतचे चारही सामने जिंकले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशचा पराभव केला आहे.

तर दुसरीकडे, न्यूझीलंडने गतविजेत्या इंग्लंड, नेदरलँड, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा पराभव केला. धरमशालामध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कोणता संघ विजयी होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

तत्पूर्वी आम्‍ही तुम्‍हाला उभय संघांच्‍या एकदिवसीय सामने आणि आयसीसीच्‍या सामन्‍यांची आकडेवारी सांगणार आहोत...

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या आयसीसी सामन्यांमध्ये भारताचा रेकॉर्ड चांगला नाही. आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने भारताला 10 वेळा पराभूत केले आहे. तर, भारताने किवी संघाचा केवळ तीन वेळा पराभव केला आहे.

टीम इंडियाला (Team India) गेल्या 20 वर्षांपासून न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी मॅच जिंकता आलेली नाही. 2003 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने न्यूझीलंडचा शेवटचा पराभव केला होता. त्यानंतर सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने 7 विकेटने विजयी पताका फडकवली होती.

यानंतर न्यूझीलंडने T20 विश्वचषक 2007 आणि T20 विश्वचषक 2016 सह एकदिवसीय विश्वचषक 2019 च्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला होता.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 आणि टी20 वर्ल्ड कप 2021 च्या अंतिम फेरीत भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. आयसीसी स्पर्धांमध्ये दोन दशकांपासून सुरु असलेला पराभवाचा कलंक पुसण्यात रोहित ब्रिगेड यशस्वी होईल का?

तसे पाहता, वनडेत न्यूझीलंडविरुद्ध भारताचा वरचष्मा आहे. दोघांमध्ये एकूण 116 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत भारताने 58 आणि न्यूझीलंडने 50 जिंकले. तर सात सामने अनिर्णित राहिले आहेत. एक सामना बरोबरीत संपला.

भारताने (India) घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 29 सामने जिंकले. जानेवारी 2023 मध्ये भारत आणि न्यूझीलंड शेवटच्या वनडेत आमनेसामने आले होते. भारताने घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा व्हाईटवॉश केला होता.

या मालिकेत कर्णधार रोहितने शतक झळकावले होते. रोहितचा सलामीचा जोडीदार शुभमन गिलने शतक आणि द्विशतक झळकावले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: 'वेलिंकरांना अटक करा, नाहीतर...'; संतप्त जमावाचा सरकारला अल्टिमेटम; डिचोलीत गुन्हा दाखल!

Rashi Bhavishya 5 October 2024: बिझनेसमध्ये धनप्राप्तीचा योग, पितृसुखाची छाया आणि खरेदीचा उत्तम संयोग; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Delhi Drug Case: मोठा खुलासा! गोव्यामार्गे दिल्लीत पोहोचले ड्रग्ज; साडेपाच हजार कोटींच्या 562 किलो कोकेन‌ची तस्करी

गोवा राजभाषा कायद्यात मराठी नको म्हणाणाऱ्या दामोदर मावजो यांची अभिजात दर्जानंतर पहिली प्रतिक्रिया; स्पृश्य - अस्पृश्यतेचा केला उल्लेख

Sand Mining: गोव्यात बांधकामांना आता 'अच्छे दिन' 'मांडवी', 'झुआरी'त रेती उपशास मुभा; दरावरही येणार नियंत्रण

SCROLL FOR NEXT