भारताचे भवितव्य आता अफगाणिस्तानच्या हातात असल्याने, भारतीय क्रिकेट चाहते न्यूझीलंडविरुद्ध शेजारी राष्ट्र असलेल्या टिमकडून चमत्कारिक विजयासाठी प्रार्थना करत आहेत.
T20 विश्वचषक उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यासाठी भारताची परिस्थिती अशी आहे
भारतीय संघाला उद्या होणाऱ्या नामिबियाचा पराभव करणे आवश्यक आहे परंतु त्याआधी अफगाणिस्तानने आज न्यूझीलंडला पराभूत करणे आवश्यक आहे.
भारतीय चाहत्यांनी आपल्या टिमची गणितं मांडली आहे आणि आता अफगाणिस्तानला ब्लॅक कॅप्सला पराभूत करण्यासाठी प्रार्थना करत आहेत जेणेकरून भारत स्पर्धेत टिकून राहील. आज न्यूझीलंडने विजय मिळवला तर ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि भारत, अफगाणिस्तान बाद फेरीत दाखल होतील.
स्कॉटलंडवर विजय मिळविल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रवींद्र जडेजाने स्पष्ट आणि प्रामाणिकपणे सांगितले की, टीम इंडीया कडे दोनच पर्याय आहेत. एक तर अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवणे किंवा बॅगा भरून मायदेशी परतण्यासाठी तयार राहणे.
दुखापतग्रस्त अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रहमानला वेळेत बरे होण्यासाठी भारतीय व्यवस्थापन फिजिओथेरपिस्ट पाठवण्यास कसे तयार झाले याबद्दल आर अश्विनने एक विनोद सुद्धा केला. त्याबरोबर वसीम जाफरने भारताची परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी एक मजेदार मीम्स देखील शेअर केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.