Neeraj Chopra Dainik Gomantak
क्रीडा

World Athletics 2023: नीरज चोप्राने जिंकलं सुवर्ण पदक! 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Neeraj Chopra: वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत रविवारी रात्री नीरज चोप्राने ऐतिहासिक सुवर्णपदकाला गवसणी घातली.

Pranali Kodre

World Athletics Championships 2023 Neeraj Chopra won gold Medal in men’s javelin:

वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत रविवारी (27 ऑगस्ट) रात्री पुरुषांची भालाफेकीची अंतिम फेरी पार पडली. या अंतिम फेरीत भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने अव्वल क्रमांक मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्याने 88.17 मीटर भाला फेकीसह सुवर्ण पदक नावावर केले.

वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

रविवारी अंतिम फेरीत नीरजपाठोपाठ पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 87.82 मीटर भाला फेकीसह रौप्य पदक जिंकले, तर चेक गणराज्यचा जाकुब वडलेजचने 86.67 मीटर भाला फेक करत कांस्य पदक जिंकले.

नदीम वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक जिंकणारा पाकिस्तानचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

नीरजचा अंतिम फेरीमध्ये पहिला प्रयत्न फाऊल ठरला होता. पण त्याने दुसऱ्या प्रयत्नात 88.17 मीटर भालाफेक करत यादीत अव्वल क्रमांक मिळवला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात 86.32 मीटर भाला फेकला. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात त्याने 84.64 मीटर भाला फेकला. त्याने पाचव्या प्रयत्नात 87.73 मीटर भाला फेकला. सहाव्या आणि अखेरच्या प्रयत्नात 83.98 मीटर भाला फेकला.

दरम्यान, याच स्पर्धेत भारताचे डीपी मनू आणि किशोर जेना यांचाही समावेश होता. या दोघांनीही अंतिम 8 जणांमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांना पदक जिंकण्यात अपयश आले. किशोर जेना 84.77 मीटर भाला फेकत पाचव्या क्रमांकावर राहिला, तर डीपी मनू 84.14 मीटर भाला फेकीसह सहाव्या क्रमांकावर राहिला.

या स्पर्धेत 25 वर्षीय नीरजने क्वालिफिकेशन फेरीत 88.77 मीटर भालाफेक करत अव्वल क्रमांकासह अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. याबरोबरच त्याने पुढील वर्षी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली आहे.

दरम्यान, नीरजने रविवारी जिंकलेले वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीपमधील भारताचे वैयक्तिक तिसरेच पदक ठरले आहे, तर पहिलेच सुवर्णपदक आहे.

यापूर्वी नीरजने गेल्यावर्षी युजिनला झालेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक मिळवले होते. तसेच 2005 साली अंजू बॉबी जॉर्जने महिला लांब उडीमध्ये कांस्य पदक जिंकले होते.

रिले आणि स्टीपलचेसमध्ये पदक जिंकण्यात अपयश

वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत रविवारी रात्री भारताची पारुल चौधरी महिलांच्या 3000 मीटर स्टिपलचेस अंतिम फेरीत धावली. पण ती 9:15.31 सेकंद वेळ नोंदवत 11 व्या क्रमांकावर राहिली.

तसेच 4x400 मीटर रिले स्पर्धेत आशियाई विक्रम करणारा भारताचा पुरुष रिले संघ अंतिम फेरीत 2:59.92 सेकंद इतकी वेळ नोंदवत 5 व्या क्रमांकावर राहिला.

मोहम्मद अनास याहिया, अमोज जेकॉब, मोहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश यांचा समावेश असलेल्या भारताच्या रिले संघाने सेमीफायनल हिटमध्ये शनिवारी 2 मिनिटे 59.05 सेकंदाचा वेळ नोंदवत आशियाई विक्रम केला होता. मात्र, त्यांना रविवारी पदक जिंकण्यात अपयश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT