Neeraj Chopra 88.67m throw: भारताचा 'गोल्डन बॉय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरज चोप्राने पुन्हा एकदा देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. त्याने यंदा त्याच्या नव्या हंगामाची शानदार सुरुवात केली आहे. शुक्रवारी रात्री नीरजने दोहामध्ये आयोजिक डायमंड लीगच्या पहिल्या लेगमध्ये विजय मिळवत आघाडी घेतली आहे.
25 वर्षीय नीरज सप्टेंबर 2022 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये डायमंड लीग फायनलमध्ये जिंकलेले विजेतेपद कायम राखण्याच्या हेतूने यंदा या स्पर्धेत उतरला आहे. त्याने दोहामध्ये होत असेलल्या डायमंड लीगमध्ये शुक्रवारी 88.67 मीटर दूर भाला फेकला. त्यामुळे तो शेवटपर्यंत अव्वल क्रमांकावरही राहिला. तसेच ही त्याच्या वैयक्तिक कारकिर्दीतील चौथ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी राहिली.
महत्त्वाचे म्हणजे नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर दूर भाला फेकला होता. त्याच्यापोठापाठ या स्पर्धेत चेक प्रजासत्ताकचा जेकॉब वडलेज्च राहिला. त्याच्या आणि नीरजच्या थ्रोमध्ये केवळ 4 सेंटीमीटरचे अंतर राहिले. जेकॉबने 88.63 मीटर दूर भाला फेकला. जेकॉबने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. तसेच तो गेल्यावर्षी डायमंड लीग फायनल्समध्येही नीरजनंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला.
तिसऱ्या क्रमांकावर अँडरसम पीटर्स राहिला. त्याने 85.88 मीटर दूर भाला फेकला. अँडरसनने गेल्यावर्षी वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये नीरजला मागे टाकत सुवर्णपदक जिंकले होते. पण यावेळी नीरजने बाजी मारली.
नीरज 2018 मध्ये या स्पर्धेत पहिल्यांदा खेळला होता. त्यावेळी तो चौथ्या क्रमांकावर राहिला होता. नीरज भारताचा पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता ऍथलिट आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. तो ट्रॅक अँड फिल्डमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ऍथलिट आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.