Indian Women's Compound Team Twitter/ @worldarchery
क्रीडा

World Archery Championships: भारताच्या पोरी जगात भारी! तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघाने जिंकले 'सुवर्ण'

Indian Women's Compound Team: भारतीय महिला कंपाउंड टीमने शुक्रवारी बर्लिन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले.

Manish Jadhav

World Archery Championships: ज्योती सुरेखा वेन्नम, प्रनीत कौर आणि अदिती गोपीचंद स्वामी यांच्या भारतीय महिला कंपाउंड टीमने शुक्रवारी बर्लिन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले. तिरंदाजी विश्व चॅम्पियनशिपमध्ये कोणत्याही प्रकारात भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. अंतिम फेरीत, तीन भारतीय खेळाडूंनी डॅफ्ने क्विंटेरो, आना सोफा हर्नांडेझ झिओन आणि अँड्रिया बेसेरा या मेक्सिकन संघाचा 235-229 असा पराभव केला.

उपांत्य फेरीत गतविजेत्या कोलंबियाचा पराभव केला

दरम्यान, पात्रता फेरीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाने उपांत्य फेरीत गतविजेत्या कोलंबियाचा 220-216 असा पराभव करुन विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला. भारतीय महिला कंपाउंड टीमने पहिल्या फेरीत बाय मिळाल्यानंतर अनुक्रमे क्वार्टर-फाइनल आणि प्री-क्वार्टर फाइनल फेरीत चायनीज तैपेई आणि तुर्की संघाचा पराभव केला होता. यापूर्वी भारताने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत 11 पदके जिंकली होती.

मेन्स आणि मिश्र संघ हरला

कंपाऊंड पुरुष संघात अभिषेक वर्मा, ओजस देवतळे आणि प्रथमेश जावकर यांना उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड संघाकडून 230-235 असा पराभव पत्करावा लागला. मिश्र कंपाऊंड सांघिक स्पर्धेत ओजस देवतळे आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांना उपांत्यपूर्व फेरीत यूएसएकडून 154-153 असा पराभव पत्करावा लागला. ज्योती सुरेखा वेन्नम, प्रनीत कौर आणि अदिती गोपीचंद स्वामी शनिवारी वैयक्तिक महिला कंपाऊंड उपांत्यपूर्व फेरीत भाग घेतील, तर ओजस देवतळे हा पुरुष विभागातील अव्वल 8 मध्ये एकमेव भारतीय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT