MS Dhoni | Richa Ghosh Dainik Gomantak
क्रीडा

INDW vs ENGW: सेम टू सेम धोनीच! ऋचा घोषचा एकहाती कॅच पाहून फॅन्सला आठवला 'कॅप्टनकूल'; Video

Video: महिला टी20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात विकेटकिपर ऋचा घोषने एका हाताने घेतलेला अप्रतिम झेल पाहून अनेकांना धोनीची आठवण झाली.

Pranali Kodre

Richa Ghosh Catch: शनिवारी महिला टी20 वर्ल्डकपमध्ये भारतीय विरुद्ध इंग्लंड महिला संघात सामना खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंडने 11 धावांनी विजय मिळवला. पण याच सामन्यात भारताची यष्टीरक्षक ऋचा घोषने घेतलेला झेल चर्चेचा विषय ठरला. तिच्या झेलाचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

या सामन्याच्या सुरुवातीलाच ऋचाने हा झेल घेतला होता. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या या निर्णयाला रेणुका सिंगने सुरुवातीच्या 5 षटकांमध्येच तीन विकेट्स घेत न्याय दिला होता.

दरम्यान, तिने टाकलेल्या सामन्याच्या पहिल्याच षटकात तिसऱ्या चेंडूवर इंग्लंडची सलामीवीर डॅनिएल वॅटने रक्षात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू तिच्या बॅटची बाहेरची कड घेऊन थेट मागे गेला. यावेळी यष्टीरक्षण करणाऱ्या ऋचाची हालचाल डाव्या बाजूला होत होती. मात्र तिने चेंडू आल्याचे पाहाताच चपळाईने उजव्या बाजूला सूर मारला आणि एका हाताने झेल घेतला.

तिने घेतलेल्या या अप्रतिम झेलचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाला. तसेच तिच्या या झेलाने अनेकांना भारताचा दिग्गज यष्टीरक्षक एमएस धोनीची आठवण करून दिली. धोनीने 2019 वनडे वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर अगदी असाच झेल घेतला होता. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर याबद्दलही प्रतिक्रिया दिली.

इंग्लंडचा विजय

मात्र, या सामन्यात रेणुकाने एकूण 5 विकेट्स घेतल्यानंतरही इंग्लंडने 20 षटकात 7 बाद 151 धावांपर्यंत मजल मारली. नतालिया स्किव्हरने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. तिला कर्णधार हिदर नाईट (28) आणि एमी जोन्स (40) यांनी चांगली साथ दिली.

यानंतर भारताकडून 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मानधनाने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच ऋचानेही नाबाद 47 धावा केल्या. मात्र अन्य भारतीय फलंदाजांना फार काही खास करता आले नाही. त्यामुळे भारताला 20 षटकात 5 बाद 140 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून साराह ग्लेनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: आजीबाईंचा भोजपुरी गाण्यावर जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओचा धूमाकूळ; नेटकरी म्हणाले, 'जुने खेळाडू मैदानात उतरले...'

Goa Court Verdict: जिल्हा न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने बदलला; खून प्रकरणात 10 वर्षे शिक्षा झालेल्या आरोपीची सुटका

Illegal Animal Hunting: अवैध शिकारीसाठी प्राण्यांना विजेचा शॉक देऊन मारणारा गजाआड; नेत्रावळी वन विभागाची मोठी कारवाई

France Violence: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

SCROLL FOR NEXT