Australia Women's Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

Women's T20 World Cup विजेत्या ऑस्ट्रेलियाला मिळाले कोट्यवधी रुपये! टीम इंडियाला किती मिळाले पैसे, घ्या जाणून

महिला टी20 वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

Pranali Kodre

Women's T20 World Cup Prize Money: ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने रविवारी महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात यजमान दक्षिण अफ्रिकन महिला संघाला 19 धावांनी पराभूत केले. ऑस्ट्रेलियन महिला संघाचे हे सहावे टी20 विश्वविजेतेपद होते.

ऑस्ट्रेलिया महिला संघाने 2010, 2012, 2014, 2018, 2020 आणि 2023 अशा सहा वर्षी झालेल्या टी20 वर्ल्डकपचे विजेतेपद जिंकले आहे. दरम्यान सहावे टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघावर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव झाला आहे.

ऑस्ट्रेलिया महिला संघाला वर्ल्डकर विजेता संघ म्हणून 10 लाख डॉलर (साधारण 8.27 कोटी रुपये) मिळाले आहेत. तसेच उपविजेता ठरलेल्या दक्षिण अफ्रिकन महिला संघाला 5 लाख डॉलर (साधारण 4.15 कोटी रुपये) बक्षीस म्हणून मिळाले आहेत.

तसेच उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या भारती आणि इंग्लंड महिला संघाला 2.10 लाख डॉलर (साधारण 1.74 कोटी रुपये) बक्षीस म्हणून मिळाले आहेत. त्याचबरोबर जे संघ साखळी फेरीतून बाहेर गेले, त्या संघांना 24.83 लाख रुपये मिळाले, त्याचबरोबर साखळी फेरीत प्रत्येक सामना जिंकण्यासाठी संघांना 14.48 लाख रुपये मिळाले.

दरम्यान, गेल्यावर्षी झालेल्या पुरुष टी20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या इंग्लंड संघाला १३ कोटी रुपये मिळाले होते. तसेच उपविजेत्या पाकिस्तान संघाला 6.5 कोटी रुपये मिळाले होते. तसेच उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 3.25 कोटी रुपये मिळाले होते.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाचा विजय

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन महिला संघाने 20 षटकात 156 धावा उभारल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मूनीने 74 धावांची अर्धशतकी खेळी केली. दरम्यान, 157 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला लॉरा वोल्वार्डच्या 61 धावांच्या खेळीनंतरही 20 षटकात 6 बाद 137 धावाच करता आल्या.

दरम्यान, बेथ मूनीला या सामन्यासाठी सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला, तसेच ऍश्ले गार्डनरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT