WPL 2023 Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023 उद्घाटनाला सेलिब्रेटींच्या परफॉर्मन्सचा तडका! जाणून घ्या कुठे आणि कसा पाहाणार Opening Ceremony

वूमन्स प्रीमियर लीग 2023 हंगाम 4 मार्चपासून सुरु होत असून या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रेटी उपस्थित राहाणार आहेत.

Pranali Kodre

WPL 2023: वूमन्स प्रीमियर लीग 2023 (WPL) 4 मार्च रोजी सुरु होणार आहे. हा डब्ल्यूपीएलचा पहिलाच हंगाम आहे. त्यामुळे सर्वांनाच या हंगामाची उत्सुकता आहे. या हंगामातील पहिला सामना 4 मार्चला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स संघात सामना होणार आहे.

हा सलामीचा सामना असून भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. दरम्यान, त्यापूर्वी पहिल्या डब्ल्यूपीएलचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रेटी हजेरी लावणार आहेत. याबद्दल बीसीसीआयने घोषणाही केली आहे.

या उद्घाटन सोहळ्या क्रिती सेनन, कियारा अडवानी, एपी धिल्लोन सारखे कलाकार परफॉर्मन्स देणार आहेत. तसेच शंकर महादेवन डब्ल्यूपीएलचे अँथम सादर करणार आहेत. त्यामुळे या उद्घाटन सोहळ्याचीही सर्वांना उत्सुकता आहे.

पहिल्या डब्ल्यूपीएल हंगामात मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, युपी वॉरियर्स, दिल्ली कॅपिटल्स हे पाच संघ सहभागी होणार आहेत. हा हंगाम एकूण 23 दिवस खेळवण्यात येणार असून एकूण 22 सामने होणार आहेत. यातील 20 सामने साखळी फेरीत होणार आहेत, तर एक एलिमिनेटर आणि अंतिम सामना असे प्लेऑफचे 2 सामने होणार आहेत.

या हंगामाचे स्वरुप असे आहे की प्रत्येक संघ 4 सामने घरच्या मैदानात आणि 4 सामने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात खेळणार आहेत. तसेच साखळी फेरीच्या अखेरीस अव्वल क्रमांकावर असेलला संघ थेट अंतिम सामना खेळेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहणारे संघ अंतिम सामन्यातील प्रवेशासाठी एलिमिनेटरचा सामना खेळतील.

डब्ल्यूपीएल 2023 हंगामाच्या उद्घाटन सोहळ्याचा तपशील

1. डब्ल्यूपीएल 2023 हंगामाचा उद्घाटन सोहळा किती तारखेला होणार आहे?

- डब्ल्यूपीएल 2023 हंगामाचा उद्घाटन सोहळा शनिवारी, 4 मार्च रोजी पार पडणार आहे.

2. डब्ल्यूपीएल 2023 हंगामाचा उद्घाटन सोहळा किती वाजता सुरू होईल?

- डब्ल्यूपीएल 2023 हंगामाचा उद्घाटन सोहळा 4 मार्चला संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होईल.

3. डब्ल्यूपीएल 2023 हंगामाचा उद्घाटन सोहळा कुठे होणार आहे?

- डब्ल्यूपीएल 2023 हंगामाचा उद्घाटन सोहळा नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे.

4. डब्ल्यूपीएल 2023 हंगामाचा उद्घाटन सोहळा टेलिव्हिजनवर लाईव्ह कोणत्या चॅनेलवर दिसेल?

- डब्ल्यूपीएल 2023 हंगामाचा उद्घाटन सोहळा टेलिव्हिजनवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेलवर लाईव्ह पाहाता येईल.

5. डब्ल्यूपीएल 2023 हंगामाचा उद्घाटन सोहळा लाईव्ह ऑनलाईन कसा पाहाता येईल?

- डब्ल्यूपीएल 2023 हंगामाचा उद्घाटन सोहळा जिओ सिनेमावर लाईव्ह दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"हांव खरें तेंच उलायला", एका शब्दाने उडाला गोंधळ; तरीही मंत्री कामत शब्दावर 'ठाम'

Goa Census: गोव्यात 2 टप्प्यांत होणार जनगणना! पूर्णपणे डिजिटल पद्धतीचा वापर; ॲपद्वारे होणार घरांची नोंद

Goa Third District: तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती! गोवा सरकारला घ्यावा लागणार 4 महिन्यात निर्णय; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढले दडपण

Goa Live Updates: रेडेघाटीत गुरे मध्ये आल्याने भाजी वाहू वाहनाचा ताबा सुटून अपघात

Goa Politics: खरी कुजबुज; खरेच ‘हार’चे ‘आ’ झाले?

SCROLL FOR NEXT