Mumbai Indians Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023 Final: मुंबईच्या पोरींनी मारलं फायनलचं मैदान! विजयी चौकार ठोकताच टीमचा जल्लोष, Video एकदा पाहाच

MI vs DC Final: मुंबई इंडियन्सने वूमन्स प्रीमियर लीगची ट्रॉफी नावावर करताच जोरदार आनंद साजरा केला.

Pranali Kodre

Delhi Capitals vs Mumbai Indians, WPL 2023 Final: पहिल्या वहिल्या वूमन्स प्रीमियर लीगचा अंतिम सामना रविवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात रंगला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईने 7 विकेट्सने विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरले.

अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्स समोर 132 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 19.3 षटकात 3 विकेट्स गमावत 134 धावा करत पूर्ण केला. हा विजय मिळवताच मुंबईच्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला.

मुंबई इंडियन्सला अखेरच्या षटकात 5 धावांची गरज होती. त्यावेळी नतालिया स्किव्हर आणि एमेलिया केर फलंदाजी करत होत्या. एमेलियाने या षटकात पहिल्या चेंडूवर 1 धाव काढली. त्यानंतर नतालिया आणि एमेलियाने दोन धावा पळून काढल्या. तर तिसऱ्या चेंडूवर स्किव्हरने विजयी चौकार मारत मुंबईचा विजय निश्चित केला.

नतालियाने चौकार ठोकताच तिने मैदानातच आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. तसेच हा चौकार गेल्यानंतर मुंबईच्या संघातील खेळाडूही धावत मैदानात आल्या. त्यानंतर सर्व खेळाडूंनी एकमेकींना मिठी मारत विजयाचा जल्लोष केला.

तसेच मुंबई इंडियन्सचे संघमालक नीता अंबानी यांनी देखील संघाबरोबर आनंद साजरा केला. या विजयाच्या क्षणांचा व्हिडिओ डब्ल्युपीएलच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

मुंबईने जिंकले विजेतेपद

अंतिम सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण दिल्लीने सुरुवातीला झटपट विकेट्स गमावल्या. तरी एका बाजू कर्णधार मेग लेनिंगने सांभाळली होती. मात्र, ती देखील 12 व्या षटकात 35 धावांवर धावबाद झाली. त्यानंतर मात्र दिल्लीची अवस्था आणखी खराब झाली होती.

दिल्लीने 79 धावांवरच 9 विकेट्स गमावल्या होत्या. पण राधा यादव आणि शिखा पांडे यांनी अखेरच्या विकेटसाठी नाबाद 52 धावांची भागीदारी करत दिल्लीला 20 षटकात 9 बाद 131 धावांपर्यंत पोहचवले. राधाने 12 चेंडूत 27 धावांची नाबाद खेळी केली. तसेच शिखाने 17 चेंडूत 27 धावांची खेळी केली.

मुंबईकडून इजी वाँग आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच एमेलिया केरने 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 132 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईनेही सुरुवातीच्या दोन विकेट्स लवकर गमावल्या होत्या. पण हरमनप्रीत कौर आणि नतालिया स्किव्हर-ब्रंट यांनी मुंबईचा डाव सांभाळत 72 धावांची भागीदारी केली. पण यावेळी दिल्लीच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करताना धावगतीवर नियंत्रण ठेवले होते. हरमनप्रीत 37 धावा करून 17 व्या षटकात धावबाद झाली.

पण नंतर नतालिया आणि एमेलिया केर यांनी मुंबईला विजयापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी पूर्ण केली. नतालियाने 55 चेंडूत 60 धावांची नाबाद खेळी केली. एमेलियाने नाबाद 14 धावा केल्या. दिल्लीकडून राधा यादव आणि जेस जोनासन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT