Delhi Capitals Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: दिल्लीची विजयी सलामी! शफाली-लेनिंगच्या आक्रमाणानंतर नॉरिसने लावला RCB ला लगाम

RCB vs DC: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्सला पराभूत केले आहे.

Pranali Kodre

Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals: मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रविवारी वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला 60 धावांनी पराभूत केले आहे.

या सामन्यात दिल्लीने बेंगलोरसमोर 224 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला 20 षटकात बाद धावाच करता आल्या. दिल्लीकडून तारा नॉरिसने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

बेंगलोरकडून स्मृती मानधना आणि सोफी डिवाईन यांनी डावाची सुरुवात केली होती. त्यांनी काही चांगले फटके मारताना चांगली सुरुवात देण्याचाही प्रयत्न केला. मात्र 41 धावांच्या भागीदारीनंतर सोफीला एलिस कॅप्सीने 14 धावांवर बाद केले. त्यानंतर तिनेच 23 चेंडूत 35 धावांची खेळी करणाऱ्या मानधनालाही 7 व्या षटकात बाद करत बेंगलोरला दुसरा धक्का दिला.

नंतर एलिस पेरीने 31 धावांची खेळी करत बेंगलोरचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला तारा नॉरिसने त्रिफळाचीत केले. यानंतर मात्र बेंगलोरचा संघ सावरू शकला नाही आणि पुढील 7 धावांत त्यांनी 4 विकेट्स गमावल्या. त्यामुळे बेंगलोरची अवस्था 7 बाद 96 धावा अशी झाली होती. मात्र यानंतर हिदर नाईटने मेगन शटला साथीला घेत आक्रमक फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी केली.

मात्र तोपर्यंत सामना जिंकण्यासाठी उशीर झाला होता. हिदरने 21 चेंडूत 34 धावांची खेळी केली. तसेच शटने 19 चेंडूत 30 धावांची खेळी केली. दिल्लीकडून नॉरिस व्यतिरिक्त एलिस कॅप्सीने 2 विकेट्स घेतली आणि शिखा पांडेने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, बेंगलोरची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकत दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. याचा फायदा दिल्लीकडून सलामीला फलंदाजीला आलेल्या शफाली वर्मा आणि कर्णधार मेग लेनिंगने घेतला. या दोघींनीही आक्रमक फलंदाजी करताना 162 धावांची भागीदारी केली.

शफालीने 45 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह 84 धावांची खेळी केली आणि लेनिगने 43 चेंडूत 14 चौकारांसह 72 धावांची खेळी केली. या दोघींनी हिदर नाईटने 15 व्या षटकात बाद केले. पण त्यानंतरही मॅरिझेन काप आणि जेमिमाह रोड्रिग्ज यांनी चांगला खेळ करत दिल्लीला 20 षटकात 2 बाद 223 धावांपर्यंत पोहचवले.

कापने 17 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 39 धावा केल्या. तसेच जेमिमाहने 15 चेंडूत 3 चौकारांसह 22 धावांची नाबाद खेळी केली. या दोघींनीही नाबाद 60 धावांची भागीदारी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

समुद्री मार्ग झाला खुला! 7 वर्षांनंतर मुरगाव पोर्टवर सुरू होणार कंटेनर सेवा, निर्यातदारांना मोठा दिलासा

World Record! 11 चेंडूत 8 षटकार... युवा फलंदाजानं ठोकलं सर्वात जलद अर्धशतक, स्फोटक फलंदाजीचा VIDEO पाहाच

Viral Video: 'ओंकार' हत्तीची शेतात अचानक एन्ट्री... म्हशींनी जीव वाचवण्यासाठी ठोकली धूम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Gujarat ATS Foils Terror Plot: मोठा दहशतवादी कट उधळला! गुजरात एटीएसने अहमदाबादमध्ये शस्त्रसाठ्यासह तिघांना ठोकल्या बेड्या; दहशतवादी नेटवर्क हादरले VIDEO

मासेविक्री बाजाराची दुरवस्था कायम, माशांच्या तुटवड्याने दर गगनाला भिडले; विक्रेत्यांचा SGPDA वर संताप

SCROLL FOR NEXT