Shafali Verma
Shafali Verma Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: शफालीचा पुन्हा दिसला 'लेडी सेहवाग' अवतार! RCB गोलंदाजांविरुद्ध लेनिंगसह हल्लाबोल, पाहा Video

Pranali Kodre

Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची धडाकेबाज फलंदाज शफाली वर्माने आक्रमक फलंदाजीसह अर्धशतकी खेळी केली. तिच्यासह कर्णधार मेग लेनिंग हिनेही दमदार फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले.

या सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दिल्लीकडून शफाली आणि लेनिंग यांनी सलामीला फलंदाजीसाठी उतरत आरसीबी गोलंदाजांची चांगलीच परिक्षा पाहिली. शफालीने तर व्हीमध्ये सुरेख फटकेबाजी करताना आरसीबीवर हल्लाबोल केला होता. तिला लेनिंगची चांगली साथ मिळाली.

शफालीने 31 चेंडूतच तिचे अर्धशतकही पूर्ण केले होते. तिने आणि लेनिंगने आरसीबीच्या गोलंदाजांना 14 व्या षटकापर्यंत यश मिळू दिले नव्हते. दोघींनीही आक्रमक फलंदाजी करताना दीडशतकी भागीदारीही साजरी केली.

पण अखेर 15 व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर लेनिंगला आणि पाचव्या चेंडूवर शफलीला हिदर नाईटने बाद केले. लेनिगने 43 चेंडूत 14 चौकारांसह 72 धावांची खेळी केली. तसेच शफालीने 45 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह 84 धावांची खेळी केली. शफाली या सामन्यात शतक करेल असे अनेकांना वाटले होते. मात्र, तिचे शतक 16 धावांनी हुकले. पण तिने खेळलेल्या अनेक शॉट्सचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

(Women’s Premier League 2023 (WPL) Delhi Capitals Shafali Verma and Meg Lanning dominated Royal Challengers Bangalore bawling with half century)

दरम्यान, शफाली आणि लेनिंग यांची पहिली जोडी ठरली आहे, ज्यांनी डब्ल्यूपीएलमध्ये शतकी भागीदारी केली आहे. तसेच शफालीने या स्पर्धेतील आत्तापर्यंतची सर्वोच्च खेळी करण्याचाही विक्रम नावावर केला आहे.

या सामन्यात शफाली आणि लेनिंग बाद झाल्यानंतर देखील मॅरिझेन काप आणि जेमिमाह रोड्रिग्ज यांनी डाव पुढे नेला. त्यांनीही आरसीबी गोलंदाजांना आणखी विकेट घेण्यात यश मिळू दिले नाही.

या दोघींनीही आक्रमक फलंदाजी करताना दिल्लीला 20 षटकात 2 बाद 223 धावांपर्यंत पोहचवले. कापने 17 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 39 धावा केल्या. तसेच जेमिमाहने 15 चेंडूत 3 चौकारांसह 22 धावांची नाबाद खेळी केली. या दोघींनीही नाबाद 60 धावांची भागीदारी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT